टीम इंडिया (Team India) आणि वेस्ट इंडीज (West indies) यांच्यातील दोन सामन्यांचा टेस्ट मालिकेला उद्या 12 जुलैपासून सुरूवात होणार आहे. या सामन्यातून अजिंक्य रहाणे वयाच्या 35 व्या वर्षी टेस्टमध्ये पुनरागमन करणार आहे. या पुनरागमनावर आता अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) याला पत्रकारांनी प्रश्न केला होता. या वयात तु्म्ही मैदानात वापसी करताय, काय वाटतंय? या प्रश्नावर अजिंक्य रहाणे याने ‘या वयात म्हणजे काय? मी अजूनही तरूण आहे. आणि माझ्यामध्ये आणखीण खूप क्रिकेट बाकी असल्याचे उत्तर दिले आहे. अजिंक्य रहाणेच्या या उत्तराने बाजूलाच उभा असलेला कर्णधार रोहित शर्मा खळखळुन हसला आहे. (ind vs wi test match ajinkya rahane team india comeback funny answer to reporter)
ADVERTISEMENT
आयपीएल 2023 मध्ये अजिंक्य रहाणे चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. या हंगामात अजिंक्य रहाणे तुफानी खेळी करून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले होते. त्याच्या या खेळीवरून प्रभावित होऊन सिलेक्शन कमिटीने त्याला वर्ल्ड़ टेस्ट चॅम्पिय़नशीपच्या संघात स्थान दिले होते.या संधीचे सोने करत अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात 89 धावांची खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या होत्या.या त्याच्या कामगिरीवरून त्याची वेस्ट इंडीज विरूद्दच्या टेस्ट सामन्यात संधी मिळाली होती.
हे ही वाचा : BCCI: रोहित-विराटचं टी20 करिअर धोक्यात? आगरकरांच्या संघ निवडीवर प्रश्नचिन्ह
वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्या डॉमनिका टेस्ट सामन्याला उद्यापासून सूरूवात होत आहे. या सामन्यापुर्वी उप कर्णधार अजिंक्य रहाणेला पत्रकारांनी प्रश्न केला होता. या वयात तु्म्ही मैदानात वापसी करताय, काय वाटतंय? या प्रश्नावर अजिंक्य रहाणे याने ‘या वयात म्हणजे काय? मी अजूनही तरूण आहे. आणि माझ्यामध्ये आणखीण खूप क्रिकेट बाकी असल्याचे उत्तर दिले आहे. रहाणे पुढे म्हणतो, मी चार-पाच वर्ष उपकप्तान राहिलो आहे. आता टीममध्ये पुन्हा वापसी केल्याने चांगले वाटतेय,असे देखील तो म्हणालाय.
डब्ल्युटीसी फायनल हा पहिला सामना होता, जो मी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना आनंद झाला. रोहित सर्व खेळाडूंना खेळण्याचे स्वातंत्र्य देतो, खेळाडूंच्या खेळास सपोर्ट करतो. ही एका चांगल्या कर्णधाराची निषाणी आहे, असे कौतूक देखील अजिंक्य रहाणे रोहित शर्माचे केले आहे.
अजिंक्य रहाणे वेस्ट इंडीज विरूद्धच्या टेस्ट मालिकेवर प्रश्न विचारला होता. यावर रहाणे म्हणाले,वेस्ट इंडीज संघाला आम्ही अजिबात हलक्यात घेत नाही आहोत. आम्ही येथे दोन प्रॅक्टीस मॅच खेळलो आहे. आमचे लक्ष गेम प्लॅन, स्ट्रेंथ आणि टीम प्लॅनवर असल्याचे देखील अजिंक्य रहाणेने सांगितले आहे.
ADVERTISEMENT