Ind vs Ire : कर्णधारपद मिळवून बुमराहन मोठं मैदान मारलं! आयर्लंड विरूद्ध मालिका खिशात

प्रशांत गोमाणे

20 Aug 2023 (अपडेटेड: 20 Aug 2023, 05:50 PM)

टीम इंडियाने आयर्लंडविरूद्धचा दुसरा टी20 सामना 33 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली आयर्लंड विरूद्धची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे

india beat ireland 2nd t20 match jasprit bumrah captaincy team india won series

india beat ireland 2nd t20 match jasprit bumrah captaincy team india won series

follow google news

टीम इंडियाने आयर्लंडविरूद्धचा दुसरा टी20 सामना 33 धावांनी जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली आयर्लंड विरूद्धची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. जसप्रीत बुमराहसाठी हा मोठा विजय आहे. कारण त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने पहिलीच मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे दुखापतीत सावरून जसप्रीत बुमराहने टीम इंडियाला हे यश मिळवून दिले आहे.(india beat ireland 2nd t20 match jasprit bumrah captaincy team india won series)

हे वाचलं का?

आर्यलंड संघाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय़ घेतला होता. त्यामुळे टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 185 धावा ठोकल्या होत्या. टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाडने 58 धावा करून अर्धशतक ठोकलं होतं. ऋतुराज गायकवाडच्या या अर्धशतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने आर्यलंड 186 धावांचे आव्हान ठेवले होते.’

हे ही वाचा : Odi world cup 2023: वनडे वर्ल्ड कपसाठी स्टार क्रिकेटरकडून निवृत्ती जाहीर

186 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या आर्यलंडची सूरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर अॅन्ड्रुला वगळता इतर खेळाडू एकेरी धावसंख्येवर आऊट झाले होते. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुरुवातीचे दोन विकेट फलंदाजाला एकही धावा न करू देता घेतले होते.
आर्यलंडच्या कॅम्परने 18, डॉकरेल 13 आणि मार्कने 23 धावा केल्या होत्या, बाकी इतर खेळाडू एकेरी धावसंख्येवर आऊट झाले होते.

अॅन्ड्रुने 72 धावांची एकाकी झुंज देऊन टीम इंडियाच्या हातचा विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला,मात्र त्यांची झूंज अपयशी ठरली आणि आयर्लंड 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 152 धावांपर्यंतच मजल मारू शकली. त्यामुळे टीम इंडियाने 33 धावांनी हा सामना जिंकला. या विजयसह तीन सामन्यांची टी20 मालिका टीम इंडियाने 2-0 ने खिशात घातली.

हे ही वाचा : Ind vs Wi: वेस्ट इंडिजने भारताला हरवले, हार्दिक पंड्या म्हणतो,’कधी कधी…’

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 5 गडी गमावून 185 धावा केल्या होत्या. या सामन्यात टीम इंडियाकडून ऋतुराज गायकवाडने 43 बॉलमध्ये सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. संजू सॅमसनने 26 बॉलमध्ये 40 धावा केल्या. तर रिंकू सिंगने 38 आणि शिवम दुबेने नाबाद 22 धावा केल्या. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 185 धावांचा डोंगर उभारला होता.

    follow whatsapp