रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मोहाली कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी मोठ्या विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकेचा एक डाव आणि २२२ धावांनी पराभव करत भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून शतक झळकावणाऱ्या रविंद्र जाडेजाने गोलंदाजीतही कमाल दाखवत सामन्यात ९ विकेट घेतल्या. श्रीलंकेचा दुसरा डाव १७८ धावांवर संपला.
ADVERTISEMENT
दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस श्रीलंकेच्या संघाची अवस्था ४ बाद १०८ अशी झाली होती. तिसऱ्या दिवशीही सुरुवातीच्या सत्रात श्रीलंकेचे गोलंदाज भारताच्या गोलंदाजीचा सामना करु शकले नाहीत. रविंद्र जाडेजा, आश्विन, बुमराह आणि शमीने भेदक मारा करत श्रीलंकेला १७४ धावांवर गुंडाळलं. जाडेजाने पहिल्या डावात पाच बळी घेतले. या कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.
Ind vs SL: डाव घोषित करण्याचा निर्णय कुणी घेतला?; ‘त्या’ वादावर जाडेजाचं स्पष्टीकरण
दुसऱ्या डावातही श्रीलंकेच्या संघाची सुरुवात खराब झाली. आश्विन आणि शमीने पहिल्या तीन फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. यानंतर मधल्या फळीत अनुभवी अँजलो मॅथ्यूज आणि धनंजय डी-सिल्वाने छोटेखानी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. जाडेजाने धनंजय डी-सिल्वाला आऊट करत श्रीलंकेची जोडी फोडली. यानंतर निरोशन डीकवेलाने एक बाजू लावून धरत संघाचा पराभव लांबवण्याचा प्रयत्न केला खरा…परंतू त्याला इतर फलंदाजांकडून साथ लाभली नाही.
‘त्या’ वादाला नाट्यमय वळण: साहाने स्क्रिनशॉट एडीट करुन सादर केला – पत्रकार बोरिया मुजुमदार
अखेरीस लहिरु कुमाराला आऊट करत आश्विनने श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून दुसऱ्या डावात जाडेजा आणि आश्विनने प्रत्येकी ४-४ तर शमीने दोन विकेट घेतल्या.
Ind vs Pak women world cup : पाकिस्तानचा १०७ धावांनी उडवला धुव्वा! भारताचा विजयी प्रारंभ
ADVERTISEMENT