थायलंड: जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Boxing Championship) भारताच्या निखत जरीनने (Nikhat Zareen)इतिहास रचला आहे. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात निखत जरीनने 52 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. . निखत जरीनने थायलंडच्या जिटपॉन्ग जुटामसचा (Jitpong Jutamas) 5-0 असा पराभव करून एकहाती विजय मिळवला.
ADVERTISEMENT
संपूर्ण लढतीत निखत जरीनचा दबदबा दिसून आला, तिने प्रतिस्पर्धी बॉक्सरवर उजव्या हाताने जबर फटका मारून या सामन्याला सुरुवात केली. निखत जरीनने या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी केली. पहिल्या सेमीफायनलमध्ये देखील तिने 5-0 ने विजय मिळवला होता. आता अंतिम सामनात देखील तिचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
निखत जरीनने गेल्या काही दिवसांत सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. निखत जरीनने 2019 आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकही पटकावलं होतं. तर याच स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तिने ब्राझीलच्या कॅरोलिन डी आल्मेडा हिचा 5-0 असा पराभव केला.
25 वर्षीय निखत जरीन ही जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पाचवी भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. बॉक्सिंग लिजेंड मेरी कोमने या चॅम्पियनशिपमध्ये 6 वेळा सुवर्णपदक जिंकून विक्रम केला आहे. भारताकडून एमसी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी. यांनी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. आता या यादीत युवा बॉक्सर निखत जरीनचेही नाव जोडले गेले आहे.
Thomas Cup Final: लक्ष्य सेनने रचला पाया, किदम्बी श्रीकांत झाला कळस; भारताला पहिलं विजेतेपद
निखत जरीनने अलीकडेच Strandja मेमोरिअल येथे पदक जिंकले होते आणि येथे दोन सुवर्णपदके जिंकणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. इथे तिने टोकियो ऑलिम्पिकच्या रौप्यपदक विजेत्याला पराभूत केलं होतं. आता विश्वविजेती बनल्यानंतर निखत जरीनकडून अपेक्षा वाढल्या आहेत. अशा स्थितीत आता नजर थेट पॅरिस ऑलिम्पिकवर खिळली आहे.
ADVERTISEMENT