भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातला टी-२० विश्वचषकाचा सामना जसजसा जवळ येतो आहे तसं या सामन्याला विरोध वाढताना दिसतो आहे. सीमेवरील दोन्ही देशांमध्ये वाढलेला तणाव आणि काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचा जीव जात असताना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत पुनर्विचार करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
“माझ्या मते भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याता पुन्हा विचार व्हावा. दोन्ही देशांमधले सीमीरचे संबंध सध्या चांगले नाहीत. टी-२० विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवण्याची ही योग्य वेळ नाही. दोन्ही देशांमध्ये सीमेवर तणावाची परिस्थिती आहे. आपल्याला मानवतेचं रक्षण करणं गरजेचं आहे आणि अशी कोणतीही गोष्ट करायची नाहीये ज्यामुळे दोन्ही देशांमधील नातेसंबंधावर ताण येईल.” जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी सामान्य नागरिकांच्या हत्या केल्यानंतर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला गिरीराज सिंह उत्तर देत होते.
सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचे सामने खेळवले जात नाही. सध्या दोन्ही संघ हे आयसीसी स्पर्धांचा अपवाद वगळता एकही मालिका खेळलेले नाहीयेत. २०१९ वन-डे विश्वचषकात हे दोन्ही संघ शेवटचे समोरासमोर आले होते. त्यामुळे प्रत्येकवेळी भारत-पाकिस्तान सामन्याची वेळ आली की त्याला होणारा विरोधही प्रामुख्याने समोर येतो.
T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव
२४ ऑक्टोबरला दोन्ही संघ दुबईत समोरासमोर येणार आहेत. आतापर्यंत विश्वचषक स्पर्धांमध्ये प्रत्येक सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली आहे. त्यामुळे यंदाचा सामन्यात कोण बाजी मारतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
T-20 World Cup : भारत पाकिस्तानचा सामनाच करु शकत नाही, अब्दुल रझाकने टीम इंडियाला डिवचलं
ADVERTISEMENT