India Vs New Zealand: यंदाच्या विश्वचषक (world cup 2023) स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणार्या टीम इंडियाने ही नामुष्कीजनक परंपरा खंडीत केली. आज विराट कोहलीच्या संस्मरणीय 95 खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर 4 गडी राखत दिमाखदार विजय मिळवला आहे. या कामगिरीमुळेच भारतीय संघाने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतली असून सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्गही आता सुकर झाला आहे.
ADVERTISEMENT
भारताची सुरुवात चांगली
भारताला विजयासाठी या सामन्यात 274 धावांचे आव्हान होते. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताची सुरुवातही चागंली झाली होती. मात्र रोहित शर्मा बाद झाला आणि त्यानंतर भारताचे फलंदाज एकामागून एक तंबूत परतू लागले.
हे ही वाचा >> चितेवरच हलू लागले आजोबांचा हात-पाय, नंतर सुरु झाली नातेवाईकांची पळापळ…
न्यूझीलंडलाचा पहिला पराभव
त्यानंतर विराट कोहलीने मात्र मैदानात ठाण मांडून धडाकेबाज फटकेबाजी करत भारताने आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केला. भारतीय टीमसाठी वर्ल्ड कपमधील हा सलग पाचवा विजय होता. या सामन्यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे समान चार गुण झाले होते. या चारही सामन्यांत दोन्ही संघांनी विजय मिळवले होते. यामुळे या सामन्यात न्यूझीलंडला या वर्ल्ड कपमधील पहिला पराभव स्वीकारावा लागला.
भारत सरसच
भारताने मात्र या वर्ल्ड कपमध्ये आपल्या विजयाची घोडदौड कायम ठेवून त्यांनी सलग पाचवा विजय मिळवला आहे. या विजयापूर्वी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांचे 4 विजयांसह 8 गुण झाले. तरीही या दोन्ही संघांमध्ये न्यूझीलंडचा रन रेट हा भारतापेक्षा अधिक आहे. त्यामुळे ते पहिल्या स्थानावर होते तर भारतीय संघ हा दुसऱ्या स्थानावर होता. मात्र या विजयानंतर भारतीय संघ आता वर्ल्ड कपमध्ये पाच विजय मिळवणारा पहिला संघ ठरला आहे. या सामन्यानंतर या वर्ल्ड कपमधील 10 गुण मिळवणारा भारत हा पहिलाच संघ ठरला आहे.त्यामुळे आता भारतीय संघ अव्वल स्थानावर आला आहे.
ADVERTISEMENT