‘…तर भारतात वर्ल्डकपही खेळणार नाही’, जावेद मियादादने बीसीसीआयला डिवचलं

मुंबई तक

• 10:33 AM • 19 Jun 2023

पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादादने (javed miandad) पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. जावेद मियादादने एशिया कप (Asia Cup) आणि वनडे वर्ल्ड कप 2023 वर मोठं विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Mumbaitak
follow google news

एशिया कपच्या आयोजनावरून भारत-पाकिस्तानमध्ये (india vs pakistan) मोठा वाद रंगला होता. यानंतर (हायब्रीड मॉड़ेल) दोन देशात स्पर्धा खेळण्याचा निर्णय घेऊन या वादावर पडदा पडला होता.मात्र आता पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादादने (javed miandad) पुन्हा एकदा हा वाद उकरून काढला आहे. जावेद मियादादने एशिया कप (Asia Cup) आणि वनडे वर्ल्ड कप 2023 वर मोठं विधान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे. (india vs pakistan icc odi world cup 2023 javed miandad big statement on asia cup ind vs pak)

हे वाचलं का?

पाकिस्तानचा माजी खेळाडू जावेद मियादादने (javed miandad) पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.आयसीसीच्या वनडे वर्ल्ड कप ड्राफ्ट शेड्युलनुसार, पाकिस्तानला 15 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेड़िअमवर टीम इंडिया विरूद्ध सामना खेळायचा आहे. या शेड्यूलचा आधार घेऊन जावेद मियादाद म्हणाले की, पाकिस्तान 2012 आणि 2016 साली भारत दौऱ्यावर गेला होता. त्यामुळे आता भारताची वेळ आहे, त्यांनी पाकिस्तानात येऊन खेळावे. बीसीसीआय जिथपर्यंत भारतीय संघाला पाकिस्तानात खेळण्यास पाठवत नाही. तिथपर्यंत पाकिस्तानने भारतात जाऊ नये, असे विधान जावेद मियादादने केले आहे.

हे ही वाचा : ODI World Cup 2023 : ‘या’ दिवशी भिडणार भारत पाकिस्तान, वेळापत्रक आलं समोर

जर मला या गोष्टीचा निर्णय़ घ्यायचा झाला असता, तर मी कोणताच सामना खेळायला भारतात गेलो नसतो, अगदी वर्ल्ड़ कप देखील नाही, असे मोठं विधान जावेद मियादाद यांनी केले आहे. तसेच आम्ही त्यांच्यासोबत (भारतासोबत) खेळायला नेहमीच तयार असतो. पण ते कधीच तयार नसतात, असा आरोप जावेद मियादाद यांनी केला आहे.

पाकिस्तान क्रिकेट आता खुप मोठा झाला आहे, आम्ही देखील टॉप लेवलचे खेळाडू तयार करतो आहे. त्यामुळे भारतात नाही गेल्यास काहीच फरक पडणार नाही आहे ,असे देखील मियादाद म्हणाले आहेत. क्रिकेट असा खेळ आहे, जो लोकांना जवळ आणतो. दोन्ही देशातील गैरसमज आणि तक्रारी दुर करतो, त्यामुळे खेळात राजकारणात आले नाही पाहिजे, असे देखील मियादाद म्हणाले आहेत.

दरम्यान यंदाच्या वर्षी एशिया कपचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यामुळे भारताचा पाकिस्तान जाण्यास नकार होता.यावरून मोठा वाद पेटला होता. या वादानंतर एशिया कप हायब्रिड मॉडेलनुसार खेळण्याचा निर्णय़ घेण्यात आला. त्यानुसार भारत त्यांचे सर्व सामने श्रीलंकेत खेळणार आहे. या निर्णयानंतर जावेद मियादाद खुश नव्हते. त्यामुळे मियादाद यांनी पाकिस्तानला या मुद्यावर कठोर भूमिका घेण्याचे सुचवल्याची माहिती आहे.

    follow whatsapp