इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्ट मॅचमध्ये पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या प्रयत्नात टीम इंडियाला पहिल्याच सेशनमध्ये दोन धक्के बसले. चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीला झटपट माघारी धाडण्यात इंग्लंडला यश आलं. विशेषकरुन भारताचा कॅप्टन विराट कोहलीचं अपयश या सामन्यात प्रकर्षाने समोर आलं. बेन स्टोक्सचा बाऊन्सर बॉल खेळण्याच्या प्रयत्नात विराट शून्यावर आऊट झाला.
ADVERTISEMENT
यानिमीत्ताने विराटची World Test Championship मधली अपयशाची मालिका सुरुच राहिलेली आहे. या स्पर्धेत सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट होण्याचा रेकॉर्ड आता कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात विराट कोहलीच्या नावावर ८ Ducks जमा झाली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीच्या विक्रमाशी त्याने बरोबरी केली.
दरम्यान विराट कोहली आऊट झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या दोन मुंबईकरांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू पहिल्या सेशनच्या अखेरीस जेम्स अँडरसनने अजिंक्यला आपल्या जाळ्यात ओढत भारताला आणखी एक धक्का दिला. पहिल्या सेशनअखेरीस भारताने ४ विकेट गमावत ८० रन्सपर्यंत मजल मारली.
ADVERTISEMENT