Ind vs Eng W-U19 : भारताची कमाल! इंग्लंडला लोळवत विश्वचषकावर कोरलं नाव

मुंबई तक

• 02:57 PM • 29 Jan 2023

Ind vs Eng W-U19 World Cup Final News : केपटाऊन : भारत विरुद्ध इंग्लंड या १९ वर्षीखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला लोळवून विश्वचषकावर नाव कोरलं आहे. इंग्लंडच्या ६९ धावांच्या माफक आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत भारताने सात विकेट्सने सामना जिंकला. या विजयाने कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वातील १९ वर्षांखालील महिला संघाने संपूर्ण देशाला दखल घेण्यास […]

Mumbaitak
follow google news

Ind vs Eng W-U19 World Cup Final News :

हे वाचलं का?

केपटाऊन : भारत विरुद्ध इंग्लंड या १९ वर्षीखालील महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला लोळवून विश्वचषकावर नाव कोरलं आहे. इंग्लंडच्या ६९ धावांच्या माफक आव्हानाचा सहजपणे पाठलाग करत भारताने सात विकेट्सने सामना जिंकला. या विजयाने कर्णधार शेफाली वर्माच्या नेतृत्वातील १९ वर्षांखालील महिला संघाने संपूर्ण देशाला दखल घेण्यास भाग पाडलं आहे. (India’s girls have created history and captain Shefali Verma’s under-19 women’s team has made the entire country take notice.

सुरुवातीला भारतानं नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी शेफाली वर्माचा निर्णय योग्य ठरवतं इंग्लंडला पहिल्या षटकापासूनच धक्के द्यायला सुरुवात केली होती. भारताने पहिल्याच षटकात इंग्लंडच्या लिबर्टी हिपला शून्यावर बाद केलं, त्यानंतर एकामागून एक धक्के देत इंग्लंडची बँटिंग ऑर्डर पॅव्हेलियनमध्ये पाठविली. तर १८ व्या षटकात ६८ धावांवर संपूर्ण संघ गारद केला. भारताकडून अर्चना देवी, पार्शवी चोप्रा आणि तितास सधू यांनी प्रत्येकी दोन बळी टिपले. सोबत मन्नत कश्यप, शेफाली वर्मा आणि सोमन सिंग यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

Pathaan : मी त्याची fan आहे हे कळल्यावर अनेकांनी मला… हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत

६९ धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारताला सुरुवातीलाच सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले. कर्णधार शेफाली वर्मा अवघ्या १५ धावांवर बाद झाली. स्वेता सेहरावतही स्वस्तःतात माघारी परतली. स्वेताला केवळ पाच धावा करता आल्या. झटपट पडलेल्या या विकेट्समुळे २ बाद २० अशी भारताची अवस्था झाली होती.

Narendra Modi यांचं मिशन BMC : अवघ्या २० दिवसांत दुसरा मुंबई दौरा!

मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या सौम्या तिवारीने भारताचा डाव सावरला. सौम्याला गोनगडी त्रिशाने चांगली साथ दिली. दोघींनीही सावध फलंदाजी करत ६९ धावांच माफक लक्ष्य १४ व्या षटकातच पूर्ण केलं आणि विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दरम्यान १९ वर्षांखालील महिलांचा हा पहिलाच विश्वचषक होता. सेमीफायनलमध्ये भारताने न्यूझीलंडला तर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

    follow whatsapp