CWG 2022, Lawn Bowls : हवालदार, क्रीडा शिक्षक अन् क्रीडा अधिकारी; सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या चौघी कोण?

मुंबई तक

• 03:18 PM • 02 Aug 2022

कोणीही एका रात्रीत स्टार बनत नाही, त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत घ्यावी लागते. बहुतेकदा ही म्हण एखाद्या यशस्वी व्यक्तीसाठी बोलली जाते यात शंका नाही. प्रत्येक यशामागे, कठोर परिश्रम, अनेक वेळा अपयश, तर कधी मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं. यातील कोणाची मेहनत दिसून येते, पण काहीजण हे काम कोणतीही चर्चा न करता करतात आणि यश मिळाल्यावर ते […]

Mumbaitak
follow google news

कोणीही एका रात्रीत स्टार बनत नाही, त्यासाठी अनेक वर्षांची मेहनत घ्यावी लागते. बहुतेकदा ही म्हण एखाद्या यशस्वी व्यक्तीसाठी बोलली जाते यात शंका नाही. प्रत्येक यशामागे, कठोर परिश्रम, अनेक वेळा अपयश, तर कधी मोठ्या संकटाला सामोरे जावं लागतं. यातील कोणाची मेहनत दिसून येते, पण काहीजण हे काम कोणतीही चर्चा न करता करतात आणि यश मिळाल्यावर ते रातोरात स्टार बनतात. या क्षणी हे सर्व लॉन बॉलमध्ये सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या भारताच्या यशस्वी चारचौघींबद्दल बोललं जात आहे, त्या आहेत लवली चौबे, रूपा राणी टिर्की, नयनमोनी सैकिया आणि पिंकी! (India Win Historic Gold Medal In Lawn Bowls)

हे वाचलं का?

1 ऑगस्टपूर्वी लवली चौबे, रूपा राणी टिर्की, नयनमोनी सैकिया आणि पिंकी यांना कदाचित त्यांच्या जवळचे मित्रच ओळखत असतील. परंतु नंतर भारतापासून कित्येक हजार मैल दूर असलेल्या बर्मिंगहॅममध्ये जे काही केले, त्यानंतर दीड तासातच त्याला देशभरातील वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवरच नाही तर सोशल मीडियापासून बातम्यांपर्यंत चर्चेचे केंद्र बनवल्या आहेत. हे काम करुन त्यांनी स्वत: तर ओळख मिळवलीच परंतु या खेळालाही एका नव्या उंचीवर घेऊन गेल्या आहेत.

बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 : भारतीय चौकडीने रचला इतिहास

2 ऑगस्ट रोजी या चौघांनी बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये लॉन बॉलची महिला स्पर्धा जिंकून इतिहास रचला. दोन पोलीस हवालदार, एक क्रीडा शिक्षक आणि क्रीडा जिल्हा अधिकारी यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने प्रथमच अंतिम फेरी गाठली, दक्षिण आफ्रिकेचा 17-12 असा पराभव करून देशासाठी ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे. या खेळाच्या इतिहासात भारताने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. पदक मिळण्यापूर्वी या खेळाची देशात जास्त ओळख नव्हती, पण आता हे चौघेही या खेळाचे भारतीय सुपरस्टार बनले आहेत.

लांब उडीचे होते स्वप्न

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संघर्षाशिवाय यश मिळत नाही. या चौघांची कथा वेगळी नाही. संघातील चार सदस्यांसाठी लॉन बॉल कधीच पहिली पसंती नव्हती, परंतु वेगवेगळ्या खेळांतून पुढे जाऊन ते इथपर्यंत पोहोचल्या आहेत. झारखंडच्या लवलीने तिच्या कारकिर्दीत लांब उडीमध्ये करियर करायचे ठरवले होते, परंतु कठोर प्रशिक्षणामुळे झालेल्या दुखापतीने ही इच्छा मोडली.

झारखंड पोलिसांमध्ये, कॉन्स्टेबल लवली यांना क्रिकेट पंचाचा पाठिंबा मिळाला, ज्यांनी काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर स्टीव्ह वॉला पहिल्यांदा लॉन बॉल खेळताना पाहिले होते आणि त्यानंतर या खेळात प्रशिक्षक म्हणून काम केले. मधुकांत पाठक यांनी लवलीला या खेळासाठी बोलावले आणि हळूहळू लवली त्याकडे आकर्षित झाले.

पहिला गेम हुकला, लॉन बॉल बनले सहारा

रूपा राणीही सुरुवातीपासून या खेळाचा भाग नव्हती, पण ती कबड्डी खेळायची. मग ती हळूहळू लॉन बॉलकडे वळली आणि मग ती भारतीय लॉन बॉल संघाची प्रमुख खेळाडू बनली. सध्या रूपा राणी झारखंडमधील रामगढ येथे जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत. 33 वर्षीय नयनमोनी सैकिया या आसाम पोलिसात कॉन्स्टेबल आहे. त्यांनीही दुसऱ्या खेळापासून सुरुवात केली आहे. त्यांना एकदा वेटलिफ्टिंगमध्ये नशीब आजमावायचे होते, परंतु तेथे फारसे यश मिळाले नाही, त्यानंतर लॉन बॉलने एक नवीन मार्ग उघडला. पिंकी दिल्लीतील आरकेपुरम येथील शाळेत क्रीडा शिक्षिका आहे, परंतु त्यापूर्वी त्यांनी क्रिकेटमध्येही करिअर करण्याचा प्रयत्न केला होता.

    follow whatsapp