2023 हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खास असणार आहे, कारण या वर्षी महिला आयपीएल सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने महिला इंडियन प्रीमियर लीगसाठी निविदा काढल्या होत्या, ज्यामध्ये कंपन्या वेगवेगळे संघ खरेदी करण्यासाठी स्पर्धा करत आहेत. बीसीसीआयने काढलेल्या निविदांमध्ये आतापर्यंत 30 हून अधिक कंपन्यांची नावे पुढे आली आहेत, ज्या संघ खरेदी करण्यासाठी पुढे आल्या आहेत.
ADVERTISEMENT
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, ज्या कंपन्यांनी महिला आयपीएलसाठी संघ खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले आहे त्यात हल्दीराम आणि अपोलोसारख्या नावांचा समावेश आहे. चेन्नईतील प्रसिद्ध श्रीराम ग्रुप, निलगिरी ग्रुप आणि कातकुरी ग्रुपने संघ खरेदी करण्यात रस दाखवला आहे.
हल्दीराम आणि अदानी समूह इच्छूक
याशिवाय अपोलो ग्रुप आणि हल्दीराम ग्रुपची नावे समोर आली आहेत. काही सिमेंट कंपन्या देखील आहेत ज्या संघ खरेदी करण्यासाठी पुढे आल्या आहेत, यामध्ये जेके सिमेंट आणि चेट्टीनाड सिमेंट यांचा समावेश आहे. याशिवाय अदानी समूह आणि कपरी ग्लोबल यांनीही संघ खरेदी करण्यासाठी निविदा घेतल्या आहेत.
25 जानेवारीपर्यंत नावं द्यावे लागतील
25 जानेवारीपर्यंत सर्व कंपन्या किंवा दावेदारांना त्यांची नावे द्यावी लागतील, कारण त्यानंतर संघ खरेदी करण्यासाठी लिलाव सुरू होईल. 1000 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक असलेली कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती समान संघ खरेदी करण्याच्या दाव्यात सामील होऊ शकते.
प्रत्येक सामन्याची किंमत 7 कोटी रुपयांपर्यंत
अनेक दिवसांपासून महिला आयपीएलची मागणी होत होती आणि आता ती खरी ठरली आहे. अलीकडेच बीसीसीआयने महिलांच्या आयपीएलसाठी मीडिया हक्क विकले आहेत, ज्यात विक्रमी कमाई केली आहे. BCCI ने Viacom 18 ला पाच वर्षांसाठी 950 कोटी रुपयांना मीडिया हक्क विकले आहेत. म्हणजेच प्रत्येक सामन्याची किंमत 7 कोटी रुपयांपर्यंत असेल.
ADVERTISEMENT