Olympics मध्ये क्रिकेटचा समावेश? 2028 Los Angeles स्पर्धेसाठी ICC प्रयत्नशील

मुंबई तक

• 09:21 AM • 10 Aug 2021

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा सांगता समारंभ ८ ऑगस्ट रोजी पार पडला. १ सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्यपदकं मिळून ७ पदकांची कमाई करत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२४ साली ऑलिम्पिकची स्पर्धा पॅरिस शहरात भरणार आहे. २०२८ साली होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसी […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचा सांगता समारंभ ८ ऑगस्ट रोजी पार पडला. १ सुवर्ण, दोन रौप्य आणि ४ कांस्यपदकं मिळून ७ पदकांची कमाई करत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. २०२४ साली ऑलिम्पिकची स्पर्धा पॅरिस शहरात भरणार आहे. २०२८ साली होणाऱ्या लॉस एंजलिस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे.

हे वाचलं का?

लॉस एंजलिस शहरात सुमारे ३० लाखांच्या घरात क्रिकेटचे चाहते आहेत. त्यामुळे क्रिकेटच्या समावेशासाठी ही स्पर्धा योग्य असल्याचं आयसीसीचं म्हणणं आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात फक्त एकदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. १९०० साली फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होता, ज्यात फक्त दोन देशांनी सहभाग घेतला होता. यानंतर क्रिकेटला ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळालं नाही. त्यामुळे २०२८ च्या स्पर्धेसाठी परवानगी मिळाल्यास १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेट खेळवलं जाईल.

२०२२ साली बर्मिंगहॅम शहरात राष्ट्रकुल स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत. या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. ही स्पर्धा पार पडल्यानंतर ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश होऊ शकतो हे दाखवणं सोपं जाईल असंही आयसीसीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश झाला तर खेळाला आणि स्पर्धेलाही त्याचा फायदा होणार आहे असं वक्तव्य आयसीसीचे हंगामी अध्यक्ष ग्रेग बार्सली यांनी केलं आहे.

Ind vs Eng 1st Test : पावसाने भारताच्या विजयाचा घास हिरावला, पहिली टेस्ट मॅच ड्रॉ

२०२८ च्या स्पर्धेत क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसीने एका समितीची स्थापना केली असून यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष इयान वॅटमोर, आयसीसीच्या स्वतंत्र संचालक इंदीरा नुयी, झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तावेंग्वा मुकुहलानी, आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष महिंदा वल्लीपुरम आणि USA क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष पराग मराठे यांचा समावेश असणार आहे.

    follow whatsapp