IPL 2021 Final : कोणालाही न जमलेला विक्रम धोनीने आज करुन दाखवला

मुंबई तक

• 02:57 PM • 15 Oct 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या विजेतेपदाची लढाई दुबईच्या मैदानाच सुरु झाली आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता या अंतिम सामन्यात KKR चा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. यादरम्यान CSK चा कॅप्टन धोनीने टी-२० क्रिकेमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ३०० सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करणारा धोनी पहिला कॅप्टन ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे असा […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाच्या विजेतेपदाची लढाई दुबईच्या मैदानाच सुरु झाली आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता या अंतिम सामन्यात KKR चा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. यादरम्यान CSK चा कॅप्टन धोनीने टी-२० क्रिकेमध्ये एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे.

हे वाचलं का?

टी-२० क्रिकेटमध्ये ३०० सामन्यांमध्ये संघाचं नेतृत्व करणारा धोनी पहिला कॅप्टन ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे असा विक्रम करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत धोनीच्या जवळ एकही कॅप्टन नाहीये.

पहिल्यांदा बॅटींग करताना चेन्नई सुपरकिंग्जने धडाकेबाज सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु-प्लेसिस यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली. विशेषकरुन ऋतुराजने KKR च्या स्पिनर्सचा नेटाने सामना करत काही चांगले फटके खेळले. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ६१ धावांची पार्टनरशीप केल्यानंतर सुनील नारायणने गायकवाडला माघारी धाडलं. ऋतुराजने ३२ धावांची खेळी केली.

IPL 2021 Final : CSK ची आश्वासक सुरुवात परंतू ‘हा’ योगायोग ठरु शकतो संघासाठी धोकादायक

    follow whatsapp