IPL 2021 : मुंबईच्या इनिंगला खिंडार, ५ विकेट घेत हर्षल पटेल चमकला

मुंबई तक

• 04:21 PM • 09 Apr 2021

गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध नवीन संघाकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. पहिल्याच मॅचमध्ये हर्षल पटेलने ५ विकेट घेत मुंबई इंडियन्सला १५९ धावांवर रोखलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटची ओव्हर टाकणाऱ्या हर्षल पटेलने फक्त १ रन्स देत ३ विकेट घेत RCB चं पारडं जड केलं. रोहित शर्मा, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव […]

Mumbaitak
follow google news

गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध नवीन संघाकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या हर्षल पटेलने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं आहे. पहिल्याच मॅचमध्ये हर्षल पटेलने ५ विकेट घेत मुंबई इंडियन्सला १५९ धावांवर रोखलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटची ओव्हर टाकणाऱ्या हर्षल पटेलने फक्त १ रन्स देत ३ विकेट घेत RCB चं पारडं जड केलं.

हे वाचलं का?

रोहित शर्मा, ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव यांच्या फटकेबाजीमुळे एका क्षणापर्यंत मुंबई इंडियन्सचं सामन्यावर वर्चस्व होतं. परंतू हर्षल पटेलच्या अखेरच्या स्पेलने सामन्याचं चित्रच पालटून टाकलं. हर्षलने ४ ओव्हरमध्ये २७ रन्स देत ५ विकेट घेतल्या. या इनिंगदरम्यान हर्षल पटेलने अनेक विक्रम आपल्या नावे करत, मानाच्या यादीत स्थानही मिळवलं. IPL च्या ओपनिंग मॅचमध्ये एखाद्या बॉलरने ५ विकेट घेण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

आयपीएलमध्ये बॉलिंगदरम्यान सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या Uncapped खेळाडूंच्या यादीत हर्षल पटेलला स्थान मिळालं आहे.

  • अंकित राजपूत – किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद (२०१८) – ५/१४

  • वरुण चक्रवर्ती – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२०२०) – ५/२०

  • हर्षल पटेल – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स (२०२१) – ५/२७

त्याआधी, आयपीएलच्या चौदाव्या सिझनमध्ये सलामीचा सामना खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने २० ओव्हर्स अखेरीस ९ विकेट गमावत १५९ पर्यंत मजल मारली आहे. ख्रिस लिन, सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर गतविजेत्या मुंबईने इथपर्यंत मजल मारली. चांगल्या सुरुवातीनंतर RCB च्या बॉलर्सनी अखेरच्या स्पेलमध्ये भेदक मारा करत मुंबईच्या स्कोअर लाईनला अंकुश लावला.

    follow whatsapp