IPL 2021 : पुणेकर ऋतुराज गायकवाडचा युएईत डंका, CSK कडून खेळताना नाबाद शतक

मुंबई तक

• 04:35 PM • 02 Oct 2021

चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणारा महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने आपला डंका वाजवून दाखवला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध अबुधाबी येथील सामन्यात ऋतुराजने अखेरपर्यंत मैदानात टिकून राहत नाबाद १०१ धावांची खेळी केली. ऋतुराजच्या शतकी खेळाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानविरुद्ध १८९ धावांपर्यंत मजल मारली आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात चेन्नईची सुरुवात अडखळती झाली. परंतू ऋतुराजने एक बाजू लावून धरत राजस्थानच्या बॉलर्सची धुलाई […]

Mumbaitak
follow google news

चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळणारा महाराष्ट्राचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने आपला डंका वाजवून दाखवला आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्ध अबुधाबी येथील सामन्यात ऋतुराजने अखेरपर्यंत मैदानात टिकून राहत नाबाद १०१ धावांची खेळी केली. ऋतुराजच्या शतकी खेळाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानविरुद्ध १८९ धावांपर्यंत मजल मारली आहे.

हे वाचलं का?

राजस्थानविरुद्ध सामन्यात चेन्नईची सुरुवात अडखळती झाली. परंतू ऋतुराजने एक बाजू लावून धरत राजस्थानच्या बॉलर्सची धुलाई केली. आधी मोईन अली आणि नंतर रविंद्र जाडेजासोबत महत्वपूर्ण भागीदारी रचत गायकवाडने आपलं शतक पूर्ण केलं. अबुधाबीच्या मैदानावर चौफेर फटकेबाजी करत ऋतुराजने ६० बॉलमध्ये ९ फोर आणि ५ सिक्स लगावत १०१ धावांची खेळी केली. या शतकी खेळीसह ऋतुराजने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.

जाणून घेऊयात आजच्या खेळीनंतर ऋतुराजच्या नावावर कोणते विक्रम जमा झाले आहेत ते?

गेल्या काही सामन्यांमधली ऋतुराज गायकवाडची कामगिरी पाहिली की धोनीने त्याच्यावर सलामीला येण्यासाठी का विश्वास दाखवला याची खात्री आपल्याला पटते. धोनीच्या याच विश्वासाला पात्र ठरत ऋतुराजने मानाच्या पंगतीत आपलं स्थान मिळवलं आहे.

याव्यतिरीक्त आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळत असताना शतक झळकावणारा ऋतुराज सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

राजस्थानकडून राहुल तेवतियाने ३ तर चेतन साकरियाने एक विकेट घेतली. परंतू ऋतुराजवर अंकुश लावण्यात राजस्थानला अपयश आलं. त्याआधी झालेल्या सामन्यात दिल्लीने अटीतटीच्या लढतीत मुंबईवर ४ विकेटने मात केली.

IPL 2021 : गतविजेत्यांचं भवितव्य ‘जर-तर’ वर, प्ले-ऑफ प्रवेशासाठी काय आहे मुंबईसमोरचे निकष?

    follow whatsapp