पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या अडचणी काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. यंदाच्या हंगामात सलग आठ सामने गमावल्यानंतर मुंबईचं प्ले-ऑफमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. आज होणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध सामन्याआधी मुंबईचा बिनीचा शिलेदार सूर्यकुमार यादवही दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.
ADVERTISEMENT
डाव्या हाताच्या दंडाचे स्नायू दुखावले गेल्यामुळे सूर्यकुमार यादव आता उर्वरित हंगाम खेळू शकणार नाहीये. 6 मे रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्यात खेळत असताना सूर्यकुमार यादवला ही दुखापत झाली होती. त्यामुळे आगामी टी-20 विश्वचषक लक्षात घेता बीसीसीआयच्या मेडीकल टीमने सूर्यकुमारला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
यंदाच्या हंगामात सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघात उशीरा दाखल झाला होता. NCA मध्ये फिटनेस टेस्ट पास केल्यानंतर सूर्यकुमारला आयपीएल खेळण्यासाठी हिरवा कंदील मिळाला होता. एकीकडे संघ निराशाजनक कामगिरी करत असताना सूर्यकुमार यादवने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं.
IPL 2022 CSK : …तर जग संपणार नाहीये, महेंद्रसिंह धोनी असं का म्हणाला?
परंतू ज्या सामन्यात सूर्यकुमार यादवला संधी मिळाली तिकडे त्याने आपली छाप पाडली. या हंगामात खेळलेल्या 8 सामन्यांमध्ये 43.29 च्या सरासरीने सूर्यकुमारने 303 रन्स केल्या, ज्यात तीन हाफ सेंच्युरीचा समावेश होता.
ADVERTISEMENT