IPL 2022 : चेन्नईच्या पराभवाचा चौकार, सनराईजर्स हैदराबाद ८ विकेटने विजयी

मुंबई तक

• 02:08 PM • 09 Apr 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या खराब कामगिरीची परंपरा आजही सुरुच राहिली आहे. नवी मुंबईच्या डी.वाय पाटील मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नईवर ८ विकेट्सने मात करत यंदाच्या हंगामातला आपला पहिला विजय नोंदवला आहे. परंतू चेन्नईच्या विजयाची पाटी अद्यापही कोरीच राहिली आहे. विजयासाठी मिळालेलं १५५ धावांचं आव्हान हैदराबादने ८ विकेट राखून पूर्ण केलं. हैदराबादचा कॅप्टन […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या खराब कामगिरीची परंपरा आजही सुरुच राहिली आहे. नवी मुंबईच्या डी.वाय पाटील मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नईवर ८ विकेट्सने मात करत यंदाच्या हंगामातला आपला पहिला विजय नोंदवला आहे. परंतू चेन्नईच्या विजयाची पाटी अद्यापही कोरीच राहिली आहे. विजयासाठी मिळालेलं १५५ धावांचं आव्हान हैदराबादने ८ विकेट राखून पूर्ण केलं.

हे वाचलं का?

हैदराबादचा कॅप्टन विल्यमसनने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. वॉशिंग्टन सुंदरने रॉबिन उथप्पाला आपल्या जाळ्यात अडकवत चेन्नईला पहिला धक्का दिला. मोईन अली आणि ऋतुराज गायकवाडने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतू नटराजनने गायकवाडला क्लिन बोल्ड करत चेन्नईला आणखी एक धक्का दिला. ऋतुराज या सामन्यातही आपली छाप पाडू शकला नाही. यानंतर मोईन अलीने अंबाती रायुडूच्या साथीने छोटेखानी भागीदारी रचत चेन्नईच्या डावाला आकार दिला.

वॉशिंग्टन सुंदरने अंबाती रायुडूला आऊट करत चेन्नईची जोडी फोडली. यानंतर मोईन अलीही लागोपाठ माघारी परतला. ज्यामुळे चेन्नईची परिस्थिती खराब झाली. यानंतर मधल्या फळीतला चेन्नईतला एकही फलंदाज मैदानात तग धरु शकला नाही आणि चेन्नईचा डाव १५४ धावांवर येऊन थांबला. हैदराबाकडून वॉशिंग्टन सुंदर आणि टी.नटराजन यांनी प्रत्येकी २-२ तर भुवनेश्वर-मार्को जेन्सन-एडन मार्क्रम यांनी १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल सनराईजर्स हैदराबाद संघाने भक्कम सुरुवात केली. युवा अभिषेक शर्माला यंदाच्या हंगामात फॉर्म सापडला. कर्णधार केन विल्यमसनसोबत पहिल्या विकेटसाठी ८९ धावांची भागीदारी करुन अभिषेक शर्माने हैदराबादला चांगली सुरुवात करुन दिली. मुकेश चौधरीने केन विल्यमसनला आऊट करत हैदराबादला पहिला धक्का दिला. यानंतर अभिषेकने राहुल त्रिपाठीच्या साथीने आपलं अर्धशतक पूर्ण करत चेन्नईच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली.

IPL 2022 ला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद, टीव्ही व्ह्यूअरशीप ३३ टक्क्यांनी घसरली

ब्राव्होने अभिषेक शर्माला आऊट करण्यात अखेरीस यश मिळवलं. अभिषेकने ५० बॉलमध्ये ५ फोर आणि ३ सिक्सच्या सहाय्याने ७५ धावा केल्या. यानंतर राहुल त्रिपाठीने निकोलस पूरनच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

स्टार IPL खेळाडूंच्या ग्लॅमरस पत्नी

    follow whatsapp