खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी यंदाचं आयपीएल हे मुंबई-पुणे शहरात आयोजित करण्यात आलं आहे. स्पर्धेसाठी जोरदार खबरदारी घेऊनही अखेरीस कोरोनाने आयपीएलच्या गोटात शिरकाव केला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहात यांना कोरोनाची लागण झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
पॅट्रीक फरहात यांच्यावर दिल्लीच्या संघाची मेडीकल टीम लक्ष ठेवून असून त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जात असल्याचं स्टेटमेंट आयपीएलने जाहीर केलं आहे. 16 एप्रिलला दिल्लीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सोबत आपला सामना खेळणार आहे.
दरम्यान, आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये दिल्लीने खरेदी केलेला ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्श दिल्लीच्या संघात दाखल झाला आहे. दिल्लीच्या संघाची यंदाच्या हंगामातली सुरुवात ही काहीशी अडखळत झाली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध सलामीचा सामना जिंकल्यानंतर दिल्लीला लागोपाठ दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला.
कोरोनाच्या भीतीमुळे यंदाचं आयपीएल मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉन; नवी मुंबईतील डी.वाय.पाटील तर पुण्यातील गहुंजे मैदानावर खेळवलं जात आहे.
ADVERTISEMENT