ADVERTISEMENT
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ अजुनही प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करु शकलेला नाहीये.
दिल्लीच्या संघाचा आज चेन्नई सुपरकिंग्जसोबत सामना रंगणार आहे. या सामन्याआधी सर्व खेळाडूंनी आपल्या हॉटेलच्या स्विमींग पूलमध्ये एकत्र वेळ घालवला.
10 सामन्यांत 5 विजय आणि 5 पराभवांसह दिल्लीचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्ले-ऑफचं स्थान गाठण्यासाठी दिल्लीला चेन्नईविरुद्ध सामन्यापासूनच विजयपथावर यावं लागणार आहे.
दिल्लीचा सलामीवीर डेव्हीड वॉर्नर सध्या चांगलाच फॉर्मात आहे. आजच्या सामन्यात त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.
संघाचा कर्णधार ऋषभ पंतलाही आता स्वतःला सिद्ध करुन दाखवावं लागणार आहे.
दिल्लीच्या संघात अनेक प्रतिभावान युवा खेळाडू असले तरीही यंदा त्यांच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही.
दिल्लीच्या संघातील एका नेट बॉलरला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आल्यामुळे पुन्हा एकदा संघाचं टेन्शन वाढलं आहे.
परंतू यामधून सावरत दिल्ली पुन्हा एकदा विनींग ट्रॅकवर परतण्याचा प्रयत्न करेल.
ADVERTISEMENT