दांडपट्टा चालवल्यासारखी बटलरकडून KKR ची धुलाई, दुसरं शतक झळकावत केला अनोखा कारनामा

मुंबई तक

• 10:57 AM • 19 Apr 2022

सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर झालेला राजस्थान विरुद्ध कोलकाता हा सामना चांगलाच रंगतदार झाला. जोस बटलरने झळकावलेलं शतक आणि चहलने घेतलेली हॅटट्रीक यामुळे क्रिकेटप्रेमींचे पैसे वसूल झाले. इंग्लंडच्या जोस बटलरने या सामन्यात कोलकात्याच्या बॉलर्सची धुलाई करत 61 बॉलमध्ये 103 धावांची इनिंग खेळली. त्याच्या या खेळीत 9 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. जोस बटलरचं यंदाच्या हंगामातलं हे […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सोमवारी मुंबईच्या ब्रेबॉन मैदानावर झालेला राजस्थान विरुद्ध कोलकाता हा सामना चांगलाच रंगतदार झाला. जोस बटलरने झळकावलेलं शतक आणि चहलने घेतलेली हॅटट्रीक यामुळे क्रिकेटप्रेमींचे पैसे वसूल झाले.

इंग्लंडच्या जोस बटलरने या सामन्यात कोलकात्याच्या बॉलर्सची धुलाई करत 61 बॉलमध्ये 103 धावांची इनिंग खेळली. त्याच्या या खेळीत 9 फोर आणि 5 सिक्स लगावल्या.

जोस बटलरचं यंदाच्या हंगामातलं हे दुसरं शतक ठरलं. या शतकी खेळीसह बटलरला एकाच हंगामात दोन किंवा त्यापेक्षा जास्त शतक झळकावणाऱ्या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत स्थान मिळालं आहे.

1) ख्रिस गेलने RCB कडून खेळत असताना 2011 साली कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब संघाविरुद्ध शतकी खेळी केली होती.

2) विराट कोहलीने 2016 साली RCB कडून खेळताना पुणे, गुजरात आणि पंजाब संघाविरुद्ध शतकी खेळी केली होती.

3) हाशिम आमलाने पंजाबकडून खेळत असताना 2017 साली मुंबई आणि गुजरातविरुद्ध शतक झळकावलं होतं.

4) शेन वॉटसनने 2018 साली चेन्नई संघाकडून खेळताना राजस्थान आणि हैदराबाद संघाविरुद्ध शतकी खेळी केली होती.

5) शिखर धवनने 2020 साली दिल्लीकडून खेळत असताना चेन्नई आणि पंजाबविरुद्ध शतक झळकावलं होतं.

    follow whatsapp