आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेते चेन्नई सुपरकिंग्जला पराभवाचा धक्का बसला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर ६ विकेट्सने मात करत यंदाच्या स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं आव्हान कोलकाताने सहज पूर्ण केलं.
ADVERTISEMENT
पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतलेल्या चेन्नई सुपरकिंग्जची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवेला उमेश यादवने झटपट माघारी धाडलं. यानंतर रॉबिन उथप्पा आणि अंबाती रायुडूने छोटेखानी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. परंतू वरुण चक्रवर्तीने उथप्पाला आपल्या जाळ्यात अडकवत चेन्नईला तिसरा धक्का दिला. यानंतर अंबाती रायुडूही कर्णधार जाडेजासोबत एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रनआऊट होऊन माघारी परतला.
है तय्यार हम ! सलामीच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची जय्यत तयारी
मुंबईकर शिवम दुबेलाही या सामन्यात आपली चमक दाखवता आली नाही. ५ बाद ६१ अशा खडतर अवस्थेत असताना चेन्नईला धोनी आणि जाडेजा यांच्या अनुभवाने सावरलं. धोनीने दोन वर्षांनी अर्धशतक झळकावत आपल्या संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. धोनीने नाबाद ५० तर जाडेजाने नाबाद २६ धावा केल्या. कोलकात्याकडून उमेश यादवने २ तर वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेलने १-१ विकेट घेतली.
IPL 2022 : Thala is Back ! तब्बल २ वर्षांनी धोनीचं आयपीएलमध्ये अर्धशतक
प्रत्युत्तरादाखल कोलकाता नाईट रायडर्सने आश्वासक सुरुवात केली. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यरने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. विशेषकरुन खराब फॉर्ममुळे भारतीय संघातलं स्थान गमावून बसलेल्या अजिंक्यने या सामन्यात काही चांगले फटके खेळले. ब्राव्होने व्यंकटेश अय्यरला माघारी धाडत कोलकात्याची पहिली जोडी फोडली. परंतू यानंतर आलेल्या प्रत्येक फलंदाजाने छोटेखानी भागीदारी रचत सामन्यावर कोलकात्याचं वर्चस्व राहील याची काळजी घेतली. कर्णधार श्रेयस अय्यरने शेल्डन जॅक्सनच्या साथीने संघाच्या आणि नवीन संघाचा कर्णधार म्हणून आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली.
ADVERTISEMENT