है तय्यार हम ! सलामीच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची जय्यत तयारी

मुंबई तक

• 12:29 PM • 26 Mar 2022

IPL च्या पंधराव्या हंगामाची प्रतीक्षा आता अखेरीस संपुष्टात आलेली आहे. वानखेडे मैदानावर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याने यंदाच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. रविवारी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी खेळाडूंनी जोमात सराव केला. प्रशिक्षक महेला जयवर्धने […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

IPL च्या पंधराव्या हंगामाची प्रतीक्षा आता अखेरीस संपुष्टात आलेली आहे. वानखेडे मैदानावर चेन्नई विरुद्ध कोलकाता सामन्याने यंदाच्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेतला सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सने पहिल्या सामन्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे.

रविवारी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रंगणार आहे. त्याआधी खेळाडूंनी जोमात सराव केला.

प्रशिक्षक महेला जयवर्धने युवा खेळाडू टीम डेव्हीडला मार्गदर्शन करताना…

कायरन पोलार्डला फलंदाजीचे बारकावे समजावून सांगताना महेला जयवर्धने. पोलार्डच्या कामगिरीवर मुंबईच्या संघ यंदा कशी कामगिरी करेल हे ठरणार आहे.

कर्णधार रोहित शर्माने नेट्समध्ये जोरदार सराव केला…यंदाच्या हंगामात रोहितसोबत इशान किशन सलामीला फलंदाजीसाठी येणार आहे.

यंदा मुंबईच्या संघात काही नव्या आणि काही जुन्या खेळाडूंचा भरणा आहे.

जसप्रीत बुमराह गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँडसोबत…

टायमल मिल्सला यंदा मुंबईने संघात स्थान दिलं आहे. त्याचा अनुभव संघासाठी फायदेशीर ठरु शकतो.

    follow whatsapp