फिटनेसशी तडजोड नाही ! निवृत्तीनंतरही सचिन जिममध्ये गाळतोय घाम

मुंबई तक

• 03:13 PM • 20 Apr 2022

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. परंतू असं असलं तरीही संघाचा आयकॉनिक प्लेअर सचिन तेंडुलकर संघातलं वातावरण हलकं-फुलकं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. सचिनने क्रिकेटला रामराम करुन आता बरीच वर्ष उलटली. पण ज्यावेळी सचिन मुंबई इंडियन्सच्या गोटात सहभागी होतो तेव्हा तो आपल्या फिटनेससोबत जराही तडतोड करत नाही. मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत सचिनही जिममध्ये मेहनत […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली आहे. परंतू असं असलं तरीही संघाचा आयकॉनिक प्लेअर सचिन तेंडुलकर संघातलं वातावरण हलकं-फुलकं ठेवण्याचा प्रयत्न करतोय.

सचिनने क्रिकेटला रामराम करुन आता बरीच वर्ष उलटली. पण ज्यावेळी सचिन मुंबई इंडियन्सच्या गोटात सहभागी होतो तेव्हा तो आपल्या फिटनेससोबत जराही तडतोड करत नाही.

मुंबई इंडियन्सच्या टीमसोबत सचिनही जिममध्ये मेहनत घेऊन स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंना मार्गदर्शन आणि मोलाचे सल्ले देण्यात सचिन नेहमी अग्रेसर असतो.

सलग सहा सामन्यांमध्ये मुंबईला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे आता प्ले-ऑफसाठी त्यांचं स्थान डळमळीत झालं आहे. यापुढील सामन्यांमध्ये दोन पराभव झाले तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून बाहेर फेकली जाईल.

    follow whatsapp