IPL 2024: कोहलीकडे ऑरेंज कॅप तरीही RCB चे वाईट हाल; कोणता संघ सर्वात पिछाडीवर?

रोहिणी ठोंबरे

• 05:47 PM • 03 Apr 2024

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे 15 सामने 2 एप्रिलपर्यंत पूर्ण झाले आहेत. या 15 सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. सर्वात वाईट स्थिती आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (MI) आहे.

Mumbaitak
follow google news

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) चे 15 सामने 2 एप्रिलपर्यंत पूर्ण झाले आहेत. या 15 सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. सर्वात वाईट स्थिती आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सची (MI) आहे. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर, यावेळी मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे, जिथे त्यांनी 3 पैकी 3 सामने हरले आहेत. मुंबई इंडियन्सचा नेट रन रेटही केवळ उणे (-1.423) मध्ये आहे. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने तीनपैकी तीन सामने जिंकले आहेत. सध्या ते सर्वोच्च पदावर आहेत. (ipl 2024 points table virat kohli have orange cap still rcb on 9th position Which team is in bottom)

हे वाचलं का?

दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) पॉइंट टेबलमध्ये मुंबई इंडियन्सच्या वर आहे आणि नवव्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 4 सामने खेळले असून तीन सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. मात्र, बंगळुरूचा एकमेव प्लस पॉइंट म्हणजे विराट कोहली फॉर्ममध्ये आहे. कोहलीने आतापर्यंत 4 सामन्यात 203 धावा केल्या आहेत. या काळात त्याची एव्हरेज 67.67 आणि स्ट्राइक रेट 140.97 आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ सर्वात बलाढ्य?

पॉइंट टेबलमध्ये राजस्थान रॉयल्स (RR) अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आहे. कोलकाताचा सामना आज (3 एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हा सामना विशाखापट्टणममध्ये आहे. श्रेयसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या केकेआरला मोठा विजय नोंदवत हॅट्ट्रिक करण्याची संधी आहे. पण दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या शेवटच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला आहे, त्यामुळे कोलकातासाठी विजय तितकासा सोपा नसेल. चेन्नई सुपर किंग्ज संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

लखनौ सुपर जायंट्स चौथ्या क्रमांकावर आहे. गुजरात टायटन्स (GT) पाचव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत.

सनरायझर्स हैदराबाद (SRH) सहाव्या क्रमांकावर आहे. सातव्या स्थानावर ऋषभ पंतची दिल्ली कॅपिटल्स (DC) आहे. पंजाब किंग्ज (PBKS) आठव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद, दिल्ली आणि पंजाबने आतापर्यंत 3 पैकी 1 सामना जिंकला आहे.

IPL 2024 ची ऑरेंज कॅप कोहलीच्या नावावर...

IPL 2024 ची ऑरेंज कॅप सध्या विराट कोहलीच्या ताब्यात आहे. त्याच्या मागे राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. परागने 3 सामन्यात 181 धावा केल्या आहेत. यानंतर हेनरिक क्लासेन (3 सामन्यात 167 धावा), निकोलस पूरन (3 सामन्यात 146 धावा), क्विंटन डी कॉक (3 सामन्यात 139 धावा) यांचा समावेश आहे.

IPL 2024 ची पर्पल कॅप कोणत्या पट्ठ्याच्या ताब्यात?

IPL 2024 ची पर्पल कॅप सध्या चेन्नई सुपर किंग्जच्या मुस्तफिझूर रहमानकडे आहे. त्याने आतापर्यंत 3 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. 

आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मयंक यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2 सामन्यात 5.12 इकॉनॉमी आणि 6.83 च्या एव्हरेजने 6 विकेट्स घेतल्या आहेत. यानंतर युझवेंद्र चहल (3 सामने, 6 बळी), मोहित शर्मा (3 सामने, 6 बळी), खलील अहमद (3 सामने, 5 बळी), ट्रेंट बोल्ट (3 सामने, 5 बळी), हर्षित राणा (2 सामने, 5 विकेट्स), नांद्रे बर्गर (3 सामने आणि 5 विकेट्स आहेत). 

    follow whatsapp