एकीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडवर अखेरच्या कसोटी सामन्यात १ डाव आणि २५ रन्सची मात करत मालिका ३-१ ने जिंकली. विराटसेनेच्या या कामगिरीने खुश असलेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आणखी एक आनंदाची बातमी आलेली आहे. India Today ने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तारीख ठरवली असून ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान ही स्पर्धा भारतात रंगणार आहे.
ADVERTISEMENT
IPL 2021 : CSK लागली तयारीला, धोनी चेन्नईत दाखल
या स्पर्धेसाठी बीसीसीआयने ६ शहरं निश्चीत केली असून यात अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, नवी दिल्ली आणि मुंबई या शहरांत हे सामने खेळवले जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने बायो सिक्युअर बबल तयार केलं आहे. आयपीएल २०२० चा हंगाम भारतात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे युएईत खेळवण्यात आला होता. पण नवीन वर्षात बीसीसीआयने बायो सिक्युअर बबल निर्माण करण्याची तयारी दर्शवत यंदा भारतातच स्पर्धा होईल असं जाहीर केलं होतं. युएईत झालेल्या आयपीएल २०२० च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत विजेतेपद पटकावलं होतं.
तयारीचा एक भाग म्हणून बीसीसीआयने नवीन वर्षात सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे ट्रॉफीचं भारतात आयोजन केलं होतं. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने बायो सिक्युअर बबल तयार केलं होतं. काही दिवसांपूर्वी चेन्नईत आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव पार पडला होता. ज्यात दक्षिण आफ्रिकेच्या ख्रिस मॉरिसवर राजस्थान रॉयल्सने १६.५० कोटींची सर्वाधिक बोली लावली होती.
IPL 2021 : मॅक्सवेलसाठी टीम ओनर्समध्ये चढाओढ, RCB ने मोजले तब्बल..
ADVERTISEMENT