ADVERTISEMENT
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 चा सीझन या महिन्यात 31 मार्चपासून सुरू होत आहे.
याची सुरूवात 2008 पासून झाली. त्यावेळेसच्या पहिल्या सीरीजमध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला? हे जाणून घेऊयात.
महेंद्र धोनी 2008 च्या सीझनमध्ये सर्वात महागडा ठरला होता. त्याला चेन्नई सुपर किंग्सने 11.46 कोटी रूपयांना बोली लावून विकत घेतलं होतं.
दुसरा क्रमांक ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा होता. त्याला दिल्ली कॅपिटल्सने 10.31 कोटींना बोली लावून विकत घेतलं होतं.
मुंबई इंडियन्सने श्रीलंकेचा माजी दिग्गज सनथ जयसूर्याला 7.45 कोटींना विकत घेतलं होतं. तो तिसरा सर्वात महागडा खेळाडू आहे.
इशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने 7.26 कोटींना विकत घेतलं. तो चौथा सर्वात महागडा खेळाडू होता.
इरफान पठाणला किंग्ज इलेव्हन पंजाबने 7 कोटींना विकत घेतलं. तो पाचवा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.
माजी ऑस्ट्रेलियन स्टार ब्रेट ली आणि आफ्रिकन खेळाडू जॅक कॅलिस या दोघांवर 6.78 कोटींना बोली लावून विकत घेतलं होतं.
दिल्लीने आरपी सिंगवर 6.68 कोटी तर, हरभजन सिंगवर मुंबई इंडियन्सने 6.50 कोटींना विकत घेतलं होतं.
ख्रिस गेल दहाव्या क्रमांकावर होता. कोलकाता नाईट रायडर्सने 6.11 कोटींची बोली लावून विकत घेतलं होतं.
ADVERTISEMENT