अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची अध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी पार पडली, यामध्ये 85 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कल्याण चौबे अध्यक्ष म्हणून निवडूण आले आहेत. जे यापूर्वी खेळाडू होते. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चौबे यांनी माजी दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिया पराभव केला आहे. मोहन बागान आणि पूर्व बंगालचे माजी गोलरक्षक 45 वर्षीय चौबेंनी 33-1 असा विजय नोंदवला. माजी कर्णधार भुतियाला राज्य संघटनांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या 34 सदस्यीय लोकांचा पाठिंबा नसल्याने चौबेंचा विजय निश्चित दिसत होता. सिक्कीमचे रहिवासी असलेले 45 वर्षीय भुतिया उमेदवारी अर्ज भरताना, त्यांच्या राज्य संघाचे प्रतिनिधी देखील प्रस्तावक किंवा समर्थक बनले नाहीत.
ADVERTISEMENT
कोण आहेत नवे अध्यक्ष कल्याण चौबे?
गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णानगरमधून निवडणूक हारलेले भाजपचे चौबे हे भारतीय वरिष्ठ संघासाठी कधीही खेळले नाहीत. फक्त ते काही प्रसंगी संघाचा भाग होते. वयोगटातील स्पर्धांमध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ते मोहन बागान आणि ईस्ट बंगालसाठी गोलरक्षक म्हणून खेळले आहेत. भुतिया आणि चौबे एकेकाळी पूर्व बंगालमध्ये सहकारी होते.
…असे आहेत निवडणुकीचे निकाल
कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हरिस हे एकमेव उपाध्यक्षपदी विजयी झाले. त्यांनी राजस्थान फुटबॉल असोसिएशनच्या मानवेंद्र सिंग यांचा 29-5 असा पराभव केला. अरुणाचल प्रदेशच्या किप्पा अजयने आंध्र प्रदेशच्या गोपालकृष्ण कोसाराजूंचा 32-1 असा पराभव करून खजिनदारपदावर निवडूण आले आहेत. कोसाराजू यांनी अध्यक्षपदासाठी भुतिया यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, तर मानवेंद्र यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. कार्यकारिणीच्या 14 सदस्यांची बिनविरोध निवड झाली आहे.
भाईचुंग भुतियाने केले कल्याण यांचे अभिनंदन
भूतियाने निवडणुकीनंतर आपल्या पहिल्या प्रतिक्रियेत सांगितले की, भविष्यातही मी भारतीय फुटबॉलच्या सुधारणेसाठी काम करत राहीन. अभिनंदन कल्याण. मला आशा आहे की तो भारतीय फुटबॉलला पुढे नेईल. तो म्हणाला, ”मला पाठिंबा देणाऱ्या भारतीय फुटबॉल चाहत्यांचे आभार. निवडणुकीपूर्वीही मी भारतीय फुटबॉलसाठी काम करत होतो आणि यापुढेही करत राहीन. होय, मी कार्यकारी समितीचा सदस्य आहे.”
नाट्यमय घटनांचाही शेवट झाला
एआयएफएफच्या निवडणुकीमुळे भारतीय फुटबॉलमधील गेल्या काही महिन्यांतील नाट्यमय घडामोडींनाही पूर्णविराम मिळाला. या दरम्यान भारतीय फुटबॉलने माजी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना डिसेंबर 2020 मध्ये निवडणूक न घेतल्याने पदावरून हटवण्यात आले होते. यानंतर प्रशासकांची समिती स्थापन करण्यात आली, जी नंतर सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. FIFA नं “तृतीय पक्षांच्या अवाजवी प्रभावाचा” हवाला देत भारताला निलंबित केले होते.
नवीन कार्यकारिणीत जीपी पल्गुना, अविजित पॉल, पी अनिलकुमार, वलंका नताशा आलेमाओ, मालोजी राजे छत्रपती, मेनला एथेनपा, मोहन लाल, आरिफ अली, के निबू सेखोज, लालनाघिंगलोवा हमर, दीपक शर्मा, विजय बाली आणि सय्यद इम्तियाज हुसेन यांचा समावेश आहे. भुतिया, आयएम विजयन, शब्बीर अली आणि क्लायमॅक्स लॉरेन्स हे खेळाडूंचे प्रतिनिधी म्हणून कार्यकारिणीत सामील होतील.
ADVERTISEMENT