पोलार्डचं विक्रमी वादळ ! एका ओव्हरमध्ये ठोकले ६ सिक्स

मुंबई तक

• 03:35 AM • 04 Mar 2021

टी-२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलंय. अँटीग्वा येथे श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात कायरन पोलार्डने एकाच ओव्हरमध्ये ६ खणखणीत सिक्स लगावल्या आहेत. अकिला धनंजयच्या बॉलिंगवर पोलार्डने ही करामत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पोलार्ड तिसरा बॅट्समन ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्ज आणि भारताच्या युवराज सिंगने […]

Mumbaitak
follow google news

टी-२० स्पेशालिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलंय. अँटीग्वा येथे श्रीलंकेविरुद्ध टी-२० सामन्यात कायरन पोलार्डने एकाच ओव्हरमध्ये ६ खणखणीत सिक्स लगावल्या आहेत. अकिला धनंजयच्या बॉलिंगवर पोलार्डने ही करामत केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पोलार्ड तिसरा बॅट्समन ठरला आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्ज आणि भारताच्या युवराज सिंगने अशी कामगिरी करुन दाखवली आहे.

हे वाचलं का?

श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं १३२ रन्सचं आव्हान वेस्ट इंडिजने पोलार्डच्या घणाघाती खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. अकिला धनंजयसाठी हा सामना लक्षात राहणारा ठरला. १३२ सारख्या छोट्या आव्हानाचा पाठलाग करताना धनंजयने हॅटट्रीक घेत वेस्ट इंडिजचा बॅकफूटला ढकललं.

३ बाद ५२ अशी वेस्ट इंडिजची अवस्था झाल्यानंतर श्रीलंकेला विजयाच्या आशा वाटत होत्या. परंतू पोलार्डने धनंजयच्या एकाच ओव्हरमध्ये ६ सिक्सर लगावत श्रीलंकेच्या स्वप्नांवर पाणी फिरवलं. अखेरीस ३८ रन्स करुन पोलार्ड आऊट झाला. पण यानंतर जेसन होल्डर आणि ड्वेन ब्राव्हो यांनी वेस्ट इंडिजच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

    follow whatsapp