ADVERTISEMENT
इंडियन प्रीमियर लीग 2023 ची आतुरता आता संपणार आहे. यंदाचा पहिला सामना 31 मार्चपासून सुरू होईल.
3 वर्षांनंतर देशातील वेगवेगळ्या स्टेडियममध्ये सामने खेळण्यात येणार असल्याने चाहते ते पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. अशा स्थितीत सामन्याची तिकिटं कशी बुक करायची याविषयी जाणून घेऊयात.
आयपीएलसाठी, वेगवेगळ्या संघांनी त्यांच्या वेबसाइटवर सामन्यांची तिकिटे विकण्यास सुरुवात केली आहे.
आयपीएल सामन्यांच्या तिकिटांची किंमत 400 ते 45 हजार रुपयांपर्यंत असून, त्यासाठी अॅडव्हानस्ड बुकिंग सुरू झाली आहे.
याशिवाय पेटीएम, बुक माय शोसह इतर अनेक वेबसाइटवर आयपीएल सामन्यांची तिकीट विक्री सुरू झाली आहे, ज्यावर अनेक ऑफर्स आहेत.
ऑनलाइन तिकीट बुकिंग व्यतिरिक्त, काही मर्यादित तिकिटे स्टेडियममधील तिकीट खिडकीवर उपलब्ध आहेत.
ADVERTISEMENT