महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोनाची लागण; दोघांवर रूग्णालयात उपचार सुरु

मुंबई तक

• 08:35 AM • 21 Apr 2021

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि मातोश्री देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. धोनीच्या आई-वडिलांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि मातोश्री देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांवरही सध्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत.

हे वाचलं का?

धोनीच्या आई-वडिलांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, धोनीच्या आई-वडिलांची प्रकृती स्थिर आहे. उपचारांनंतर त्यांची प्रकृती सुधारेल आणि त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Covishield लसीची किंमत जाहीर, ‘ही’ लस घेण्यासाठी आता किती पैसे मोजावे लागणार?

सध्या महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या संघासोबत आहे. आज चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मॅच आहे. धोनी आज कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या मॅचमध्ये टीमचं नेतृत्व करण्यासाठी वानखडेच्या मैदानात उतरणार आहे. आयपीएलसाठी बायो बबलच्या नियमांचं धोनी पालन करत असल्याने कुटुंबियांशी तो संपर्कात आलेला नाही.

धार्मिक स्थळांच्या माध्यमातून कोव्हिड रुग्णांची सेवा करणारे कोव्हिड योद्धे

देशात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. गेल्या 24 तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 95 हजार नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशात आतापर्यंत 1 कोटी 32 लाख 76 हजार 39 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत. देशात सध्याच्या घडीला 21 लाख 57 हजार 538 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

    follow whatsapp