मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियन संघावर चिडला; म्हणाला, भारताकडून काहीतरी शिका

मुंबई तक

20 Feb 2023 (अपडेटेड: 29 Mar 2023, 06:32 PM)

Australian ex cricketer Michael Clarke: भारताकडून कांगारूंच्या सततच्या पराभवाने ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे (Border gavaskar Trophy ) . पॅट कमिन्सच्या कर्णधार (Australia captain pat cummins) असलेल्या संघाने स्वप्नातही विचार केला नसेल की, भारतीय भूमीवर संघाची अशी हालत होईल. दोन आठवड्यांनंतर, पाहुणा संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची संधी आधीच गमावली आहे. दरम्यान, […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

Australian ex cricketer Michael Clarke: भारताकडून कांगारूंच्या सततच्या पराभवाने ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली आहे (Border gavaskar Trophy ) . पॅट कमिन्सच्या कर्णधार (Australia captain pat cummins) असलेल्या संघाने स्वप्नातही विचार केला नसेल की, भारतीय भूमीवर संघाची अशी हालत होईल. दोन आठवड्यांनंतर, पाहुणा संघ मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकण्याची संधी आधीच गमावली आहे. दरम्यान, भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची खराब कामगिरी ‘मोठ्या चुकांनी’ भरलेली असल्याचे मत माजी कर्णधार मायकेल क्लार्कने (Michael Clarke) व्यक्त केले. ex cricketer Michael Clarke on Australian cricketers

हे वाचलं का?

दिल्लीत भारताचा डंका; तिसऱ्याच दिवशी ऑस्ट्रलियाचा केला 6 गडी राखून पराभव

सराव सामना खेळला नाही, सराव शिबिरातून काम चालवलं : क्लार्क

9 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी सराव सामना न खेळून ऑस्ट्रेलियाने सर्वात मोठी चूक केल्याचे क्लार्कला वाटते. त्याऐवजी कमिन्सने नागपुरातील मालिकेच्या सुरुवातीच्या कसोटी सामन्यापूर्वी बेंगळुरूजवळ लहान सराव शिबिराची निवड केली आणि त्याआधी घरच्या मैदानावर भारतीय परिस्थितीप्रमाणे परिस्थिती तयार करून सराव केला. क्लार्क सोमवारी बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्टवर म्हणाला, ‘मी जे पाहतोय त्याचे मला आश्चर्य वाटत नाही कारण आम्ही सराव सामन्यात भाग घेतला नाही. परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तिथे किमान एक सर्व सामना असायला हवा होता.

पहिल्या टेस्टमध्ये ट्रॅव्हिस हेडला का खेळवलं नाही? : क्लार्क

अव्वल फिरकी गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या कमकुवतपणा पहिल्या दोन कसोटीत उघड झाला. दिल्लीत पाहुण्या संघाच्या फलंदाजांनी स्वीप खेळून फिरकीपटूंना तोंड देण्याचा प्रयत्न केला, मात्र ही रणनीती सपशेल अपयशी ठरली. क्लार्कच्या मते, याशिवाय दुसरी मोठी चूक म्हणजे पहिल्या कसोटीत ट्रॅव्हिस हेडला न खेळवणे.

डावखुरा फलंदाज हेडने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 46 चेंडूत 43 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 113 धावांत आटोपला. कसोटी सामन्यात त्याने पहिल्यांदाच डावाची सलामीला उतरला.

तिसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला झटका; कर्णधार कमिन्स घरी परतला

अर्धे फलंदाज स्वीप किंवा रिव्हर्स स्वीपने बाद झाले : मायकल क्लार्क

क्लार्क म्हणाला, ‘पहिल्या कसोटीसाठी निवडलेला संघ मोठी चूक. दुसऱ्या कसोटीत स्वीप शॉट खेळले गेले. पहिल्या कसोटी सामन्यात आम्ही बरेच स्वीप शॉट पाहिले. जेव्हा तुम्ही तुमचा डाव सुरू करता तेव्हा ती स्वीप करण्याची योग्य वेळ नसते. कमी उसळी असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचे निम्मे फलंदाज स्वीप किंवा रिव्हर्स स्वीप करून बाद झाले. क्लार्क म्हणाला, ‘तुमच्या आजूबाजूला किती सपोर्ट स्टाफ आहे हे महत्त्वाचे नाही, तुम्ही ऑस्ट्रेलियासाठी खेळत आहात. साहजिकच सर्वोच्च स्तरावर खेळणारा फलंदाज म्हणून तुम्ही रिवॉर्ड विरुद्ध जोखीम मोजता.

फलंदाजी कशी करायची ते भारताकडून शिकायला हवं : क्लार्क

फिरकीला अनुकूल परिस्थितीत फलंदाजी कशी करायची हे ऑस्ट्रेलियाने भारताकडून शिकायला हवे होते, असेही क्लार्क म्हणाला. तो म्हणाला, ‘आम्ही भारताची फलंदाजी पाहत नसल्याचे दिसते. असे मानले जाते की या लोकांना परिस्थिती चांगली माहित आहे आणि त्यानुसार ते खेळत आहेत. ते इतके चांगले असताना आपण काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न का करू? असं माजी कर्णधार म्हणाला. ‘आम्ही 200 धावा केल्या असत्या तर सामना जिंकू शकलो असतो. आमची धावसंख्या एका विकेटसाठी 60 धावा होती. ऑस्ट्रेलियाने 52 धावा जोडून त्यांचे शेवटचे 9 विकेट गमावले. भारताला 115 धावांचे लक्ष्य मिळाले होते ते त्यांनी 4 गडी गमावून पूर्ण केले.

    follow whatsapp