MS Dhoni IPL 2025: आयपीएलमधला सर्वात यशस्वी कर्णधार आणि सिनिअर खेळाडू महेंद्रसिंह धोनी हा पुढची आयपीएल खेळणार का? असा प्रश्न चेन्नईच्या फॅन्सना पडला होता. आता या प्रश्नाचे उत्तर समोर आले आहे. महेंद्र सिंह धोनी हा पुढची आयपीएल 2025 खेळण्याची शक्यता आहे. अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. मात्र बीसीसीआयने ग्रीन सिग्नल दिल्यावरच हे शक्य होणार आहे. (ms dhoni can play ipl 2025 as uncaper player in chennai super king bcci likely to brinh back old retention rule)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएस धोनी आयपीएल 2025 मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. बीसीसीआय जर तो जूना नियम लागू केला तर चेन्नई सुपर किंग्स लिलावापूर्वी एमएस धोनीला कायम ठेवू शकते. आणि धोनी 2025ची आयपीएल खेळताना दिसणार आहे.
ADVERTISEMENT
ओल्ड रिटेंशन म्हणजे काय?
ओल्ड रिटेंशन नियमानुसार चेन्नई सुपर किंग्स लिलावापूर्वी एमएस धोनीला संघात कायम ठेवू शकते. आणि धोनी 2025ची आयपीएल खेळू शकतो. यासाठी किमान पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या क्रिकेटपटूंना अनकॅप्ड कॅटेगरीत ठेवण्यात आल्याचे बीसीसीआयच्या जुन्या रिटेन्शन नियमांमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Rajendra Shingne : ''बँकेच्या अडचणीमुळे नाइलाजाने अजितदादांसोबत गेलो...'', पवारांचा आमदार 'हे' काय बोलून गेला
बीसीसीआयचा हा नियम आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून होता, पण तो कधीच वापरला गेला नाही. या कारणास्तव बीसीसीआयने 2021 मध्ये हा नियम रद्द केला होता. आता गेल्या महिन्यात आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत सीएसके व्यवस्थापनाने हा जुना रिटेन्शन नियम परत आणण्याबाबत
बीसीसीआयकडे विनंती केली होती. आणि बीसीसीआय एमएस धोनीसाठी हा नियम परत आणू शकते.
दरम्यान या नियमानुसार एमएस धोनीलाही अनकॅप्ड खेळाडूंच्या श्रेणीत ठेवता येईल. मेगा लिलावापूर्वी CSK धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवू शकते. अशाप्रकारे त्याला 2025 ची आयपीएल खेळता येईल.
गेल्या महिन्यात हैदराबादमधील एका कार्यक्रमात आयपीएल 2025 बाबत बोलताना एमएस धोनीने म्हणाला,यासाठी अजून बराच वेळ आहे. खेळाडू कायम ठेवण्याबाबत ते काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल. तसेच चेंडू सध्या आमच्या कोर्टात नाही. नियम झाले की त्यानंतर मी बघेन संघासाठी काय सर्वोत्तम होईल?, असे धोनी म्हणाला होता.
धोनीला इतके कोटी मिळणार?
महेंद्रसिंग धोनीच्या वक्तव्यानंतर बीसीसीआय रिटेन्शन नियम परत आणण्याचा विचार करत आहे. जुना रिटेन्शन नियम लागू केल्याने चेन्नई सुपर किंग्जला मोठा फायदा होणार आहे. सीएसकेला धोनीसारखा अनुभवी खेळाडू मिळेल आणि फ्रँचायझीला जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
जुन्या नियमानुसार अनकॅप्ड खेळाडूला फक्त 4 कोटी रुपये दिले जातील. 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये धोनीला 12 कोटी रुपयांना रिटेन करण्यात आले होते. या नियमानुसार धोनीला आयपीएल 2025 मध्ये 4 कोटी रुपये मिळतील.
हे ही वाचा : Manoj Jarange : ''शेवटी मराठा द्वेष जागा...'' जरांगेंचा नाव न घेता कुणावर निशाणा?
जर महेंद्रसिंग धोनी आयपीएल 2025 मध्ये अनकॅप्ड खेळाडू म्हणून खेळला, तर थला चाहत्यांना एमएस धोनी आयपीएलच्या आणखी एका हंगामात खेळताना दिसेल. धोनी आयपीएलमध्ये खेळणार की नाही? कायम ठेवण्याच्या नियमाबाबत बीसीसीआयच्या निर्णयानंतर हे स्पष्ट होईल.
ADVERTISEMENT