Mahendra Singh Dhoni, IPL 2025 : आयपील 2025 च्या सीझनला अद्याप 7-8 महिने बाकी आहेत. त्याआधीच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super King) संघातून मोठी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा माजी कर्णधार असलेला महेंद्र सिंह धोनी पुढच्या वर्षीचा आयपीएल सीझन देखील खेळणार आहे. या संदर्भात धोनीची चेन्नईचे मालक एन श्रीनिवासन यांच्याशी चर्चा झाली आहे. मात्र आता रिटेंन्शनच्या नियमावरून धोनी (Mahendra Singh Dhoni) आयपीएल 2025 चा सीझन खेळणार की नाही? हे स्पष्ट होणार आहे. (ms dhoni might play for chennai super king in ipl 2025 if bcci permit for retention increased mahendra singh dhoni)
ADVERTISEMENT
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील गेल्या काही वर्षापासून धोनी चेन्नई संघाकडून आयपीएल खेळत आहे. या दरम्यान आयपीएलचा प्रत्येक सीझन संपल्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा होते. मात्र धोनी काय आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करत नाही. त्यात गेल्या 2024 च्या सीझनमध्ये धोनीकडील चेन्नईचं कर्णधार पद काढून घेत ते नवख्या ऋतुराज गायकवाडला खांद्यावर दिले होते. त्यामुळे आता खरंच धोनी आयपीएलमधून निवृत्त होईल अशी चर्चा सुरू झाली होती. पण आयपीएल संपून देखील धोनीने निवृत्ती घेतली नाही. त्यामुळे आता चाहत्यांना धोनी आयपीएल 2025 चा सीझन खेळणार का? असा मोठा प्रश्न होता. यावर आता चेन्नई संघाकडून मोठी अपडेट समोर आली आहे.
हे ही वाचा : Raj Thackeray : "शरद पवारांनी या गोष्टीला हातभार लावू नये", ठाकरेंचा टोला
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, महेंद्र सिंह धोनी याची चेन्नई संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्याशी आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये खेळण्याबाबत चर्चा झाली होती. पण धोनीचे आयपीएलमध्ये खेळणे हे आयपीएलच्या रिटेन्शच्या नियमावर निर्भर असणार आहे.
जर आयपीएल 2025 च्या लिलावात संघांना पाच ते सहा खेळाडू रिटेन करण्याची परवानगी मिळाल्यास धोनी सीएसकेकडून खेळू शकतो. पण जर फक्त चार खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळाली, तर धोनीच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान रिटेन्शनबाबत आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा सुरू आहे.त्यासाठी 31 जुलै रोजी मुंबईत बैठक होणार आहे. एन श्रीनिवासन यांची कन्या रुपा गुरुनाथ यांचा यात समावेश असणार आहे.
दरम्यान जर चार खेळाडूंना कायम ठेवल्यास सीएसके संघ गायकवाड,रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना आणि शिवम दुबे यांना कायम ठेवू शकतो. मात्र, हा रिटेंशनबाबतचा अंदाज आहे. अधिक रिटेंशन ठेवण्याची परवानगी मिळाल्यास धोनी संघात सामील होऊ शकतो. या काळात तो संघासाठी मेंटॉरचीही भूमिका बजावू शकतो.
हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत तुमचं नाव आहे का, कुठे पाहता येणार यादी?
धोनी 2008 पासून आयपीएलमध्ये चेन्नईसोबत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली या संघाने पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. रोहित शर्मासह तो आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. IPL 2024 मध्ये धोनी फक्त शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला यायचा आणि फारशा धावा देखील करायचा नाही. त्यामुळे त्याला अनेकदा ट्रोलही करण्यात आले होते. पण आता रिटेन्शन संदर्भात काय नियम बनतो? आणि धोनीला खेळायची संधी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT