Ind Vs Pak: टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताविरुद्धच्या पहिल्याच सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघ 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता आमनेसामने असतील. याच हायव्होल्टेज सामन्याच्या 24 तास आधी पाकिस्तानने आपल्या 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. त्यापैकी 11 खेळाडूंची निवड केली जाईल.
ADVERTISEMENT
देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्याने अष्टपैलू शोएब मलिकचे पाकिस्तानच्या संघात पुनरागमन झाले आहे. तसेच मोहम्मद हाफिजसारखे वरिष्ठ खेळाडूही पाकिस्तानच्या संघात आहेत.
भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरीस रौफ, हैदर अली
हा सामना भारत आणि पाकिस्तानसाठी खूप महत्त्वाचा आहे. T20 विश्वचषक 2021 च्या सुपर-12 फेरीतील दोन्ही संघांचा हा पहिला सामना आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांना चांगली सुरुवात करावी लागणार आहे. जर आपण रेकॉर्डवर एक नजर टाकली तर आतापर्यंत दोन्ही संघांनी टी-20 विश्वचषकात पाच सामने खेळले आहेत आणि पाचही सामन्यात टीम इंडियाच विजयी झाली आहे.
तथापि, आतापर्यंत प्रत्येक एक्सपर्टने असे म्हटले आहे की, मोठ्या सामन्यात काहीही होऊ शकते, परंतु या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड आहे. टीम इंडियाने आपले दोन्ही सराव सामने जिंकले आहेत. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या बलाढ्य संघांना पराभूत केलं आहे.
टी-20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचा संघ: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, दीपक चहर, अक्षर पटेल
T-20 World Cup : …म्हणून तुम्ही आमच्याविरुद्ध जिंकत नाही ! ‘विरु’ने काढला पाकिस्तानला चिमटा
सुपर-12 मध्ये टीम इंडिया कोणा-कोणाशी भिडणार?
• 24 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
• 31 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड
• 3 नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान
• 5 नोव्हेंबर – भारत विरुद्ध स्कॉटलंड
• 8 नोव्हेंबर – भारत विरुद्ध नामिबिया
ADVERTISEMENT