२४ ऑक्टोबरला दुबईत भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये विश्वचषकात सामना रंगणार आहे. तब्बल २ वर्षांनी हे संघ समोरासमोर येणार आहेत. या सामन्याआधी झालेल्या सराव सामन्यांमध्ये दोन्ही संघांनी चांगली सुरुवात केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारताला हरवण्याचा आत्मविश्वास व्यक्त केलाय. परंतू वर्ल्डकप लढतींचा इतिहास हा भारताच्या बाजूने आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानचे माजी खेळाडू जावेद मियाँदाद यांनी वर्ल्डकपमध्ये भारताला हरवण्यासाठी पाकिस्तानच्या संघाला एक गुरुमंत्र दिला आहे.
T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव
“या स्पर्धेत पाकिस्तानला विजयी सूर गवसणं गरजेचं आहे, त्यासाठी भारताविरुद्धचा सामना हा अतिशय महत्वाचा आहे. भारताचा संघ हा तगडा संघ आहे, त्यांच्याकडे अनेक विख्यात खेळाडू आहेत. पण जर पाकिस्तानचा संघ कोणतीही भीती आणि दडपण न बाळगता खेळला तर आपण त्यांना नक्कीच हरवू शकतो. जर सर्व संघाने एकत्र येऊन चांगली कामगिरी केली तर पाकिस्तान या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल.”
Ind vs Pak : सामना आम्हीच जिंकू ! टी-२० विश्वचषकाआधी पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझमला आत्मविश्वास
T-20 क्रिकेट हा असा प्रकार आहे की तिकडे एक किंवा दोन खेळाडू तुम्हाला सामना जिंकवून देऊ शकतात असं अनेकांना वाटतं. परंतू माझ्यामते या प्रकारातही संघातील सर्व सदस्यांचं योगदान महत्वाचं आहे. पाकिस्तानचा संघ फक्त बाबर आझमवर अवलंबून राहू शकत नाही, असं म्हणत मियाँदाद यांनी पाकिस्तानला मोलाचा सल्ला दिला आहे.
भारत आणि पाकिस्तान या सामन्याआधी खेळाडूंवर असणाऱ्या दडणपाबाबतही मियाँदाद यांनी महत्वाचं भाष्य केलं आहे. “सर्व खेळाडू हे प्रोफेशनल आहेत, त्यामुळे त्यांनी दडपण न घेता या सामन्याकडे शांतचित्ताने पाहून खेळणं गरजेचं आहे. पाकिस्तानपुरतं बोलायचं झालं तर तुम्ही सर्वोत्तम आहात म्हणून तुम्हाला संघात जागा मिळाली आहे. तुमच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. प्रत्येक बॉलवर फटके खेळण्याची गरज मला वाटत नाही. योग्य बॉलची वाट पाहून चांगले फटके खेळणं गरजेचं आहे”. त्यामुळे मियाँदाद यांचा गुरुमंत्री पाकिस्तानी संघाला फायदेशीर ठरतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Video : म्हातारा झालायस तू ! सराव सामन्यात जेव्हा बाबर आझम आपल्याच सहकाऱ्याची खिल्ली उडवतो
ADVERTISEMENT