‘ऋषभ पंत थोडं वजन कमी कर’, शोएब अख्तरचा पंतला सल्ला

मुंबई तक

• 09:42 AM • 20 Jul 2022

भारतीय क्रिकेट संघांचा विकेटकिपर आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंत हा सध्या चर्चेत आलाय. इंग्लडसोबतच्यासिरीजमध्ये शेवटच्या सामन्यात पंतने स्फोटक फलंदाजी करत 125 धावांची मौल्यावान कामगिरी केली होती. त्यानेमैदानाच्या चारही बाजूला फटके मारत धावा मिळवल्या होत्या. याच दमदार खेळीमुळे त्याने संघाला विजय मिळवूनदिला. या विजयासह भारतीय संघाने इंग्लडसोबतची वनडे सिरीज देखील जिंकली. आता शोएब अख्तरने त्याला महत्त्वाचा […]

Mumbaitak
follow google news

भारतीय क्रिकेट संघांचा विकेटकिपर आणि स्फोटक फलंदाज ऋषभ पंत हा सध्या चर्चेत आलाय. इंग्लडसोबतच्यासिरीजमध्ये शेवटच्या सामन्यात पंतने स्फोटक फलंदाजी करत 125 धावांची मौल्यावान कामगिरी केली होती. त्यानेमैदानाच्या चारही बाजूला फटके मारत धावा मिळवल्या होत्या. याच दमदार खेळीमुळे त्याने संघाला विजय मिळवूनदिला. या विजयासह भारतीय संघाने इंग्लडसोबतची वनडे सिरीज देखील जिंकली. आता शोएब अख्तरने त्याला महत्त्वाचा सल्ला दिला आहे.

हे वाचलं का?

ऋषभ पंतला शोएब अख्तरने नेमका काय सल्ला दिला आहे?

पंतने केलेल्या शतकाची सर्वत्र चर्चा आहे. त्याच्याकडे भारताचं भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. क्रिकेट जगतातत्याची प्रशंसा होऊ लागली आहे. यात पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तर याचा देखील समावेश आहे. त्याने ऋषभ पंत याच्या फलंदाजीची भरपूर प्रशंसा केली. सोबत वजन कमी करण्याचा सल्ला देखील दिलाय.

रावळपिंडी एक्स्प्रेस म्हणून ओळख असलेल्या शोएब अख्तरने आपला एक युट्यूब चॅनेल काढला आहे. त्यावर तोक्रिकेट जगतातील विविध विषयांवर चर्चा करत असतो. अनेकांवर टीका आणि प्रशंसा करण्याचं काम तो व्हिडीओच्यामाध्यमाने करत असतो. अशात त्याने मंगळवारी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्याने प्रामुख्याने ऋषभ पंतचंतोंडभरून कौतुक केलंय. इंग्लडसोबतच्या खेळीवर बोलताना शोएब म्हणाला की, ऋषभ हा ऋषभ पंत नसून ऋषभफेंटा आहे. पंत अतिशय तगडा प्लेयर आहे, असं शोएब म्हणाला.

पुढे बोलताना शोएब म्हणाला पंत मैदानाच्या चारी बाजूला फटके मारू शकतो. त्याने तस इंग्लडसोबतच्या खेळीतदाखवून ही दिलं आहे. तो नेहमी आत्मविश्वासाने भरलेला असतो. तो फलंदाजी करत असताना खूप मारतो. इंग्लंडसोबतची सिरीज पंतच्या नावाची होती, असं कौतुक शोएबने पंतचं केलंय. मात्र यासह चांगला खेळत असलातरी थोडा तो ओव्हर वेट वाटतोय. त्यामुळे त्याने आपलं वजन कमी करण्यासाठी लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे, असासल्ला देखील शोएबने पंतला दिलाय.

ऋषभ पंतमध्ये भरपूर टॅलेंट आहे. तो यापुढे अनेक टीम्सना आपल्या फलंदाजीच्या जोरावर संकटात टाकू शकतो. तोभारताचा सुपरस्टार बनण्यासाठी कॅपेबल आहे. फक्त त्याने आपल्या शारीरिक फिटनेसकडे लक्ष द्यावं, असं शोएबम्हणाला. आता शोएब अख्तर याने दिलेल्या सल्ल्याला ऋषभ किती मनावर घेतो आणि आपल्या फिटनेसकडे लक्षदेतो का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp