आयपीएलच्या आगामी हंगामासाठी लिलाव बंगळुरुत पार पडला. १० संघांनी पंधराव्या सिझनसाठी खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली. या बोलीमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंसाठीही संघ मालकांमध्ये चांगलीच चुरस रंगलेली पहायला मिळाली. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या तीन संघांनी महाराष्ट्रातील खेळाडूंवर जास्तीत जास्त विश्वास दाखवला.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुंबई इंडियन्सने मात्र यंदा अर्जुन तेंडुलकरचा अपवाद सोडला तर स्थानिक खेळाडूंकडे पाठ फिरवलेली पहायला मिळाली. जाणून घेऊयात कोणत्या संघाने महाराष्ट्रातील खेळाडूंना दाखवली पसंती.
कल्याणचा तुषार देशपांडे आयपीएलमध्ये धोनीसोबत खेळणार, भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न
१) चेन्नई सुपरकिंग्ज – ऋतुराज गायकवाड (कायम राखलेला खेळाडू), शिवम दुबे, तुषार देशपांडे, राजवर्धन हांगर्गेकर, प्रशांत सोलंकी
२) दिल्ली कॅपिटल्स – पृथ्वी शॉ (कायम राखलेला खेळाडू), सर्फराज खान, शार्दुल ठाकूर, विकी ओत्सवाल
३) कोलकाता नाईट रायडर्स – श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, उमेश यादव, अमन खान
४) मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव (दोन्ही कायम राखलेले खेळाडू), अर्जुन तेंडुलकर
५) पंजाब किंग्ज – जितेश शर्मा, अथर्व तायडे
६) राजस्थान रॉयल्स – यशस्वी जैस्वाल (कायम राखलेला खेळाडू)
७) गुजरात सुपरजाएंट – दर्शन नळकांडे
IPL 2022 : अमरावतीकर जितेश शर्मावर पंजाब किंग्सची बोली, २० लाखांची रक्कम मोजत घेतलं संघात
दोन दिवस चाललेल्या या लिलावात मुंबई इंडियन्सने इशान किशनसाठी १५.२५ कोटी रुपये मोजले. इशान यंदाच्या हंगामातला सर्वात महागडा खेळाडू ठरला. तर चेन्नई सुपरकिंग्जने दीपक चहरसाठी १४ कोटींच्या घरात रक्कम मोजली. दुसऱ्या दिवशी लिव्हींगस्टोनसाठी पंजाबने ११.५० कोटी रुपये मोजले. अनेक युवा खेळाडूंना या लिलावात संधी मिळाली असली तरीही सुरेश रैना, इशांत शर्मा, स्टिव्ह स्मिथ, ओएन मॉर्गन या खेळाडूंवर कोणत्याही संघाने बोली लावली नाही.
ADVERTISEMENT