इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपमध्ये भारताला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय चाहते नाराज आहेत. विराट कोहली आणि रवी शास्त्री जोडगोळीचे प्लान्स नेमके अंतिम सामन्यात कसे फेल जातात असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जाऊ लागला आहे. अनेकांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याची मागणी केली.
ADVERTISEMENT
जुलै महिन्यात राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जातो आहे. अनेकांनी भारतीय संघाची सूत्र राहुल द्रविडच्या हाती देण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने श्रीलंकेत आश्वासक कामगिरी करुन दाखवली तर भविष्यकाळात रवी शास्त्रींसाठी ही धोक्याची घंटा समजली जाऊ शकते.
India Tour of Sri Lanla : राहुल द्रविडसोबत माजी मुंबईकर खेळाडू करणार टीम इंडियाला मार्गदर्शन
प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींची कामगिरी उल्लेखनीय असली तरीही संघाला विजेतेपद मिळवून देण्यात ये अयशस्वी ठरलेत हे सत्य देखील तितकंच खरं आहे. आजही भारतीय संघात अनेक उणीवा बाकी आहेत ज्याची उत्तर आपल्याला मिळालेली नाहीत. परंतू दुसरीकडे राहुल द्रविडची प्रशिक्षक म्हणून कामगिरी ही सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत राहुल द्रविडसारख्या व्यक्तीला टीम इंडियाची सूत्र हाती देणं हे भारतीय संघासाठी फायदेशीर ठरु शकतं.
राहुल द्रविडकडे प्रशिक्षणाचा बक्कळ अनुभव –
४८ वर्षीय राहुल द्रविडने आतापर्यंत टीम इंडियातल्या अनेक यंगस्टर्सना मार्गदर्शन केलं आहे. भारत अ, १९ वर्षाखालील भारतीय संघाला राहुल द्रविडने मार्गदर्शन करुन विजेतेपद मिळवून दिलं आहे. २०१८ साली राहुल द्रविडच्याच मार्गदर्शनाखाली भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक जिंकला होता.
याव्यतिरीक्त राहुल द्रविडकडे सध्या बंगळुरुतल्या नॅशनल क्रिकेट अकादमीचं संचालकपद आहे. इथे राहुल टीम इंडियाच्या सिनीअर प्लेअर्सना मार्गदर्शन करणं, त्यांच्या फिटनेसवर लक्ष ठेवणं तसेच तरुण खेळाडूंच्या तंत्राकडे लक्ष देणं अशी महत्वाची भूमिका बजावतो आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचा राहुल द्रविडवर विश्वास आहे. याआधीही द्रविडने भारताच्या यंगस्टर्सना ग्रुमिंग केल्याबद्दल राहुल द्रविडचे आभार मानले आहेत.
भविष्यकाळात रवी शास्त्रींना पर्याय –
सध्या भारतीय चाहते रवी शास्त्रींवर नाराज असले तरीही आगामी टी-२० विश्वचषक पाहता भारताच्या मॅनेजमेंटमध्ये लगेच बदल होणं शक्य नाहीये. परंतू राहुलच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकेत शिखर धवनच्या भारतीय संघाने यश मिळवलं तर भविष्यात राहुल द्रविड हा रवी शास्त्रींसाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. कारण टीम इंडियाच्या सिनीअर प्लेअर्ससोबत प्रशिक्षक म्हणून काम करण्याची राहुल द्रविडची ही पहिलीच वेळ असणार आहे.
सध्या टीम इंडियाच्या स्ट्राँग बेंच स्ट्रेंथचं सर्वत्र कौतुक होतंय. ही बेंच स्ट्रेंथ तयार करण्याचं मुख्य श्रेय हे NCA मधल्या राहुल द्रविडच्या टीमलाच जातं. याव्यतिरीक्त राहुल द्रविडबद्दल सर्व खेळाडूंच्या मनात आदर आहे. त्यामुळे श्रीलंकेत सर्व गोष्टी जुळून आल्या तर भविष्यकाळात भारतीय संघात राहुल द्रविड हा रवी शास्त्रींना नक्कीच पर्याय ठरु शकतो.
ADVERTISEMENT