Rahul Dravid Team India Head Coach : आयसीसी वर्ल्ड कपच्या समाप्तीनंतर आता राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी नवीन प्रशिक्षक कोण बनणार? की कार्यकाळ वाढवण्यात येणार, असे अनेक प्रश्न फॅन्सना पडले आहेत. त्यात राहुल द्रविडला दोन संघानी प्रशिक्षक पदाची ऑफर दिली आहे. हे दोन संघ कोण आहेत? आणि राहुल या संघाची ऑफर स्विकारणार का? हे पाहावे लागणार आहे. (rahul dravid team india head coach ipl team mentor world cup 2023 bcci contract)
ADVERTISEMENT
राहुल द्रविड (Rahul Dravid) 2021 च्या टी20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचा (Team India) हेड कोच बनला होता. तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविडला टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी विराजमान केले होते. त्यानंतर आता राहुल द्रविडचा कार्यकाळ संपलाय.
हे ही वाचा : ”आरक्षण हवंय, पण बाबासाहेबांच नाव घ्यायचं नाही”, गोपिचंद पडळकरांनी जरांगेंना सुनावलं
‘या’ संघाचा बनणार मेंटॉर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड आयपीएल फ्रँचायझी लखनऊ सुपर जायंट्स (LSG) सोबत चर्चा करत आहे. जर ही चर्चा यशस्वी ठरली तर द्रविड आयपीएल 2024 पूर्वी लखनऊचा मेंटॉर बनू शकतो. पण हे सर्व द्रविड आणि बीसीसीआय यांच्यातील संभाव्य बैठकीच्या निकालावरून ठरवले जाईल. तसेच द्रविड त्याचा कार्यकाळ वाढवण्याची मागणी करेल अशी शक्यता फारच कमी आहे.
2008 ची आयपीएल चॅम्पियन राजस्थान रॉयल्स (RR) देखील राहुल द्रविडसाठी इच्छूक आहे. राजस्थान रॉयल्सलाही त्याला संघाचा मेंटॉर बनवायचे आहे. द्रविड यापूर्वी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससोबत खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्ही भूमिकेत दिसला आहे. द्रविडने भारत-ए आणि एनसीएमध्ये दीर्घकाळ काम केले आहे.
हे ही वाचा : Crime : दुहेरी हत्याकांडाने नगर हादरलं! मायलेकाला कारने चिरडून संपवलं, शेजाऱ्याने हत्या का केली?
द्रविडची कारकिर्द
राहुल द्रविडच्या या दोन वर्षांच्या कारकिर्दीत भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, परंतु द्विपक्षीय सामन्यांमध्ये संघाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. भारत सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये जागतिक क्रमवारीत नंबर-1 आहे. द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडियाने क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये सलग 10 सामने जिंकले आणि अंतिम फेरी गाठली, जिथे ऑस्ट्रेलियाकडून 6 गडी राखून पराभव झाला.
ADVERTISEMENT