आगामी काळात टीम इंडियात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, बॉलिंग कोच भारत अरुण, फिल्डींग कोच आर.श्रीधर आणि बॅटींग कोच विक्रम राठोड यांनी टी-२० विश्वचषकानंतर आपली जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. रवी शास्त्री यांनी आपला हा निर्णय बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांना कळवल्याचं समजतंय.
ADVERTISEMENT
इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करार टी-२० विश्वचषकानंतर संपुष्टात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शास्त्री यांचे सहकारी काही आयपीएल संघमालकांशी कोचिंग संदर्भात चर्चा करत आहेत.
NCA संचालक पदासाठी BCCI ने मागवले अर्ज, Rahul Dravid पुन्हा अर्ज करण्याची शक्यता
याचसोबत बीसीसीआयलाही आता भारतीय संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये नवीन माणसं हवी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाला नवीन प्रशिक्षक मिळणार हे निश्चीत असल्याचं बोललं जातंय. २०१४ साली रवी शास्त्री यांनी टीम इंडियाचे संचालक म्हणून जबाबदारी घेतली. २०१७ साली रवी शास्त्री यांना संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आलं.
बीसीसीआयने NCA च्या संचालकपदासाठी अर्ज मागवले आहेत. NCA चा संचालक म्हणून काम पाहणाऱ्या राहुल द्रविडचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआय राहुल द्रविडचा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी विचार करु शकतं. राहुलच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या युवा संघाने श्रीलंकेत आतापर्यंत चांगली कामगिरी करुन दाखवली आहे.
रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआय कोणाचा विचार करु शकतं याचा थोडक्यात आढावा –
१) टॉम मूडी – ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू असलेल्या टॉम मूडी यांनी याआधीही भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. परंतू यात त्यांना यश आलं नाही. परंतू आयपीएलमध्ये सनराईजर्स हैदराबादच्या माध्यमातून अनेक तरुण भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचा टॉम मूडी यांना अनुभव आहे.
२) माईक हेसन – न्यूझीलंडच्या संघाचे माजी प्रशिक्षक असलेले हेसन सध्या आयपीएलमध्ये RCB ला मार्गदर्शन करतात. २०१९ साली रवी शास्त्री यांचा दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली, त्यावेळी माईक हेसन यांचं नावही चर्चेत होतं. कपिल देव यांच्या निवड समितीने हेसन यांच्या व्हिजनचं कौतुकही केलं होतं. त्यामुळे रवी शास्त्री यांच्या जाण्यानंतर हेसन यांच्या नावाचा नक्कीच विचार होऊ शकतो.
३) ३) राहुल द्रविड – सध्याच्या घडीला राहुल द्रविडचं नाव या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर आहे. NCA च्या माध्यमातून भारतीय संघाच्या राखीव फळीला तयार करण्यात राहूल द्रविडचा मोलाचा वाटा आहे. याचसोबत द्रविडने याआधी भारताच्या U-19 संघालाही मार्गदर्शन केलंय. नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंका दौऱ्यावरही द्रविड कोच म्हणून गेला होता. अनेक क्रिकेटप्रेमींच्या मते देखील द्रविड हा कोचच्या पोजिशनसाठी योग्य उमेदवार आहे. त्यामुळे रवी शास्त्री यांच्यानंतर बीसीसीआय कोणाचा विचार करतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT