ADVERTISEMENT
रवीचंद्रन अश्विन (R Ashwin) भारतासाठी कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणार दुसरा गोलंदाज बनणार आहे.
याआधी भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेटचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.
आर अश्विनने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जबरदस्त गोलंदाजी करत भारताला मोठा विजय मिळवून दिला.
नागपूर कसोटी सामन्यात आर अश्विन हा पाचवे फिरकीपटू होता ज्याने 450 कसोटी विकेट घेतल्या आहेत.
आता दिल्ली कसोटीत अश्विन अनेक कसोटी विक्रम आपल्या नावे करण्याची शक्यता आहे.
आर अश्विनने आणखी 3 विकेट घेतल्या तर तो अनिल कुंबळेनंतरचा कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 विकेट घेणारा दुसरा भारतीय क्रिकेटर ठरेल.
दिल्लीत अश्विनने 27 विकेट घेतल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियममध्ये सर्वाधिक कसोटी बळी घेणारा अश्विन हा तिसरा गोलंदाज आहे.
अरूण जेटली स्टेडियममध्ये अनिल कुंबळेने एकूण 58 कसोटी विकेट घेतल्या होत्या.
जर अश्विनने दिल्लीत आणखी 6 विकेट घेतल्या तर तो कपिल देवचा अरूण जेटली स्टेडियमवर घेतलेल्या 32 विकेटचा रेकॉर्ड मोडू शकेल.
ADVERTISEMENT