Ravindra Jadeja Reaction on Father Anirudhsinh Jadeja:टीम इंडियाचा स्टार खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या दुखापतग्रस्त असून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या माध्यमातून तो स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. वयाची पस्तीशी पूर्ण करणाऱ्या जडेजाने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 15 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानंतर तो शुक्रवारी अचानक चर्चेत आला आहे, तो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे त्याचे वडील अनिरुद्ध सिंग जडेजा यांनी त्याच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. जडेजाच्या वडिलांनी आपला मुलगा रवींद्र आणि सून रिवाबा (Rivaba Jadeja) यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी अगदी जाहिरपणे सांगितले आहे.
ADVERTISEMENT
प्रतिमा मलीन
रवींद्र जडेजाच्या वडिलांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर रवींद्र जडेजानेही वडिलांच्या मुलाखतीनंतर त्यांना उत्तर दिलं आहे. वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीना त्याने नाकारल्या आहेत. तर दुसरीकडे त्या मुलाखतीतून पत्नी रिवाबाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्याने म्हटले आहे.
स्क्रिप्टेड मुलाखत
जडेजाने सोशल मीडियावर पोस्ट करून वडिलांच्या मुलाखतीतील सगळेच मुद्दे नाकारले आहेत. वडिलांच्या त्या स्क्रिप्टेड मुलाखतीत ज्या काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्याकडे दुर्लक्ष करा असंही त्याने म्हटले आहे.
मुलाखतीत एकच बाजू
रवींद्र जडेजाने गुजरातीमध्ये वडिलांच्या मुलाखतीविषयी लिहिले आहे की, 'दिव्य भास्करमध्ये आलेल्या मुलाखतीत जे काही सांगितले आहे ते चुकीचे आहे. त्या मुलाखतीत कोणताही अर्थ नाही. त्या मुलाखतीत फक्त एका बाजूचा मुद्दा मांडण्यात आला आहे. त्यामुळे त्या गोष्टीचा मी निषेध करतो असंही त्याने म्हटले आहे.
मी बोलणार नाही
त्या मुलाखतीतून माझ्या पत्नीची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असून ही गोष्ट खूपच वाईट आहे अशी खंतही त्याने व्यक्त केली आहे. मात्र 'त्यांच्याप्रमाणेच माझ्याकडेही खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, मात्र त्या न सांगितलेल्याच बऱ्या असंही त्यांनी म्हटले आहे.
आमदार रिवाबा
जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा सध्या जामनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. 8 डिसेंबर 2022 रोजी त्या आमदार म्हणून निवडून आल्या.
रवींद्रवर गंभीर आरोप
यापूर्वी दिव्य भास्करला दिलेल्या मुलाखतीत त्याचे वडील अनिरुद्ध सिंग यांनी टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर रवींद्र जडेजावर अनेक गंभीर आरोप केले होते. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, 'मुलगा रवींद्र बरोबर आता आमचे कोणतेही संबंध नाही.
पत्नीला फक्त पैसा पाहिजे
यावेळी त्यांनी रवींद्र आणि त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याला आम्ही क्रिकेटर बनवले नसते तरी बरे झाले असते, तर दुसरीकडे त्याची पत्नी रिवाबा जडेजा हिला फक्त पैशांचा संबंध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे'.
आमचा संबंध नाही
वडील अनिरुद्ध यांनी या मुलाखतीत बोलताना सांगितले की, 'रवींद्र आणि त्यांची पत्नी रिवाबा यांच्याबरोबर आपला कोणताही संबंध नाही'. तर त्याच वेळी त्यांनी हे सांगितले की, 'माझा एक मुलगा आहे, मात्र आता मनातील ती भावनाच मरून गेली आहे. लग्न केले नसते तर बरे झाले असते' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी हे ही सांगितले की, 'त्याला क्रिकेटर बनवण्यासाठी आम्ही मोठे कष्ट घेतले आहेत, तर आमच्याबरोबरच त्याच्या बहिणीनेही त्याच्यासाठी खूप काही केले आहे'.
हॉटेलवरून वाद
रवींद्र जडेजाच्या वडिलांनी त्यांच्या नात्याविषयी बोलताना सांगितले की, 'आम्ही त्यांना फोन करत नाही आणि ते आम्हाला फोन करत नाहीत'. मात्र रवींद्रच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांमध्येच वाद सुरु झाले. त्यातच त्याच्या वडिलांनी सांगितले की, 'त्यांना 20 हजार रुपये पेन्शन मिळते, त्यावरच घरखर्च चालवला जातो. 'लग्नानंतर रिवाबाला हॉटेल आपल्या नावावर करायचे होते, त्या गोष्टीवरूनच आमचे संबंध बिघडल्याचे त्यांनी सांगितले.'
रवींद्रची सासूची मध्यस्थी
रवींद्रच्या वडील हे ही सांगतात की, 'जामनगरममध्ये 2 बीएचके फ्लॅटमध्ये गेल्या दहा वर्षांपासून तो एकटाच राहतो. मात्र गेल्या दहा वर्षापासून तो आम्हाला सोडून तो एकटाच राहतो. त्यामुळे त्याच्या रिवाबाने त्याच्या काय जादू केली आहे हे माहिती नाही. त्याचबरोबर रवींद्र जडेजाची सासूही त्यांच्या कौटुंबीक वादात तोंड घालते', त्यामुळेच जडेजाच्या वडिलांनी आपल्या नातवाचे पाच वर्षापासून त्याचे तोंड त्यांनी बघितले नाही.
ADVERTISEMENT