Ravindra Jadeja : 'क्रिकेटर बनवलं नसतं, तर बरं झालं असतं... तो सगळं बायकोचंच ऐकतो..., जडेजाचे वडिलांची खळबळजनक मुलाखत

प्रशांत गोमाणे

10 Feb 2024 (अपडेटेड: 10 Feb 2024, 04:22 PM)

Ravindra Jadeja : भारताचा स्टार क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि त्याचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांच्यात सध्या वाद सुरु आहेत. जडेजाचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांनी जडेजाची पत्नी रिवाबावर कुटूंबात फुट पाडल्याचा आरोप केला आहे.

भारताचा स्टार क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि त्याचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांच्यात सध्या वाद सुरु आहेत. जडेजाचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांनी जडेजाची पत्नी रिवाबावर कुटूंबात फुट पाडल्याचा आरोप केला आहे.

ravindra jadeja rivaba jadeja team india ravindra jadeja father make serious allegation on jadeja and rivaba jadeja team india cricketer

follow google news

Ravindra Jadeja :  भारताचा स्टार क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि त्याचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांच्यात सध्या वाद सुरु आहेत. जडेजाचे वडील अनिरूद्धसिंह जडेजा यांनी जडेजाची पत्नी रिवाबावर कुटूंबात फुट पाडल्याचा आरोप केला आहे. 'मी आणि माझा मुलगा (रवींद्र) एकमेकांच्या संपर्कात नाही. आम्ही एकाच शहरात राहतो. तरी देखील आमच्यात कुठल्याही प्रकारचं संभाषण नाही'', असे अनिरूद्धसिंह जडेजा यांनी म्हटले आहे. या आरोपावर आता रवींद्र जडेजाने त्यावर उत्तर दिले आहे. (ravindra jadeja father make serious allegation on jadeja and rivaba jadeja team india cricketer) 

हे वाचलं का?

अनिरूद्धसिंह जडेजा यांनी दैनिक भास्करला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. 'रवींद्र जडेजाच्या लग्नाच्या दोन-तीन महिन्यानंतरच वाद व्हायला सुरुवात झाली. आता माझं रवी (रवींद्र जडेजा) आणि त्याची पत्नी रिवाबासोबत कोणतेच नातं नाही आहे. ना आम्ही त्यांना बोलवतं, ना ते आम्हाला बोलवतात', असा खुलासा जडेजाच्या वडिलांनी केला. 

हे ही वाचा : 'निर्ढावलेला, निर्घृण.. निर्दयी आणि लांडग्यासारखा गृहमंत्री', ठाकरेंना संताप अनावर; फडणवीसांवर तुटून पडले
 
 लग्नाच्या तीन महिन्यानंतर तिने (रिवाबा) मला सांगितले की, 'सर्व काही माझ्या नावावर ट्रान्सफर करा. यामुळे आमच्या कुटुंबात तेढ निर्माण झाली. तिला कुटुंब नको होते आणि स्वतंत्र जीवन हवे होते, असा खुलासा देखील जडेजाच्या वडिलांनी केला. कुटुंबाशी त्यांचे आता काहीच नाते नाही आहे. पाच वर्षांत आम्ही आमच्या नातवाचे तोंडही पाहिले नाही.  पण तिच्या सासरचे मजा मस्ती करतायत'. 
 
'बायकोने (रिवाबा) त्याच्यावर काय जादू केलाय काय माहिती. बायकोचा तो गुलाम झालाय.त्यापेक्षा त्याने लग्नच केलं नसतं तर बरं झालं असतं. तो क्रिकेटर झाला नसता तर बरंच झालं असतं, आमची अशी अवस्था झाली नसती', असे अनिरूद्धसिंह जडेजा यांनी मुलाखतीत सांगितले. 

हे ही वाचा : Balu More : शिवसेनेनंतर भाजप नेत्याला गोळ्या घालून संपवलं, जळगाव हादरलं!

जडेजा काय म्हणाला? 

वडिलांच्या या आरोपानंतर रवींद्र जडेजा रिवाबाच्या मदतीसाठी धावून आला आहे. त्याने एक्सवर एक पोस्ट लिहली आहे की, वडिलांनी केलेली वक्तव्ये निरर्थक आणि साफ खोटी आहेत. ती सगळी एकतर्फी वक्तव्ये आहेत. माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा सगळा प्रकार अयोग्य आणि निंदनीय आहे. मला सार्वजनिकरीत्या यावर काही बोलायचं नाही. मी सार्वजनिकपणे न बोलणेच उचित ठरेल, असे जडेजा म्हणाला आहे. 

    follow whatsapp