टीम इंडियाचा युवा विकेटकिपर ऋषभ पंतसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. आयसीसीने नव्याने सुरु केलेल्या Player of the Month या पुरस्काराचा पहिला मानकरी पंत ठरला आहे. आयसीसीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर याची माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
प्रत्येक महिन्यात वन-डे, टी-२० आणि टेस्ट अशा तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या तीन प्लेअर्सना आयसीसी या पुरस्कारासाठी नॉमिनेट करणार आहे.
अवश्य वाचा – कौतुकास्पद ! ऋषभ पंत मॅच फी उत्तराखंडमधील बचावकार्याला देणार
जानेवारी महिन्यात आयसीसीने ऋषभ पंतसोबत इंग्लंडचा कॅप्टन जो रुट आणि आयर्लंडचा अनुभवी प्लेअर पॉल स्टर्लिंगलाही नॉमिनेट केलं होतं. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सिडनी आणि ब्रिस्बेन टेस्ट मॅचमध्ये महत्वाची इनिंग खेळली होती.
यानंतर चेन्नई टेस्ट मॅचमध्येही पहिल्या इनिंगमध्ये पंतने ९१ रन्सची इनिंग खेळत संघाचा डाव सावरला. जो रुटनेही श्रीलंकेनंतर चेन्नईत डबल सेंच्युरी करत पंतला चांगली टक्कर दिली. पण पहिल्या-वहिल्या पुरस्काराच्या शर्यतीत पंतने रुटला मागे टाकत Player of The Month पुरस्कारावर मोहर उमटवली आहे.
ADVERTISEMENT