Rohit Sharma ODI Captain: टी-20 नंतर वनडेचं कॅप्टन पदही रोहित शर्माकडे, कोहलीला आणखी एक धक्का

मुंबई तक

• 03:36 PM • 08 Dec 2021

मुंबई: T20 च्या कर्णधारपदानंतर रोहित शर्माची बीसीसीआयने वनडे फॉरमॅटच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तसेच रोहित शर्माची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे मालिकेतून कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळणार आहे. वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलला जाईल अशी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: T20 च्या कर्णधारपदानंतर रोहित शर्माची बीसीसीआयने वनडे फॉरमॅटच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. तसेच रोहित शर्माची कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही नियुक्ती करण्यात आली आहे. रोहित दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे मालिकेतून कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळणार आहे.

हे वाचलं का?

वनडे फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन बदलला जाईल अशी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. बीसीसीआयने विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माची भारतीय वनडे संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

याआधी टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने टी-20 टीमचं कॅप्टन पद सोडलं होतं. तसंच आयपीएल टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या कर्णधारपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर बोर्ड विराट कोहलीच्या जागी वनडे कर्णधार म्हणून दुसऱ्या एखाद्या खेळाडूची नियुक्ती करू शकते अशी अटकळ सुरू होती. ज्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या T20 मालिकेत कर्णधारपद स्वीकारलं होतं. आता दक्षिण आफ्रिकेत खेळली जाणारी वनडे मालिकेपासून तो पूर्णवेळ वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्माची पहिलीच मालिका असणार आहे.

रोहित शर्माने आतापर्यंत 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने 8 सामने जिंकले आहेत तर 2 मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2018 मध्ये UAE मध्ये खेळलेल्या आशिया चषकाचं जेतेपदही पटकावलं होतं.

रोहित शर्माचा T20 कर्णधार म्हणून रेकॉर्ड देखील खूप चांगला आहे. रोहितने T20 मध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी 22 सामने खेळले आहेत. त्यापैकी 18 जिंकले आहेत आणि 4 मध्ये पराभव पत्करला आहे.

विराट कोहलीने 95 वनडे सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी त्याने 65 सामन्यात विजय, 27 पराभव आणि 1 सामना बरोबरीत सुटला होता. त्याचवेळी टी-20 च्या 50 सामन्यात विराटने कर्णधारपद भूषवलं होतं. ज्यामध्ये त्याने 30 सामने जिंकले आहेत आणि 16 सामने गमावले आहेत. विराटच्या नेतृत्वाखाली 2 सामने टायही झाले आहेत.

वनडे कर्णधार म्हणून विराट:

  • मॅच : 95

  • विजय : 65

  • पराभव : 27

  • टाय : 1

  • काहीही निकाल नाही: 2

टी-२० कर्णधार म्हणून विराट:

  • मॅच : 50

  • विजय : 30

  • पराभव : 16

  • टाय: 2

  • काहीही निकाल नाही: 2

ड्रेसिंग रुममधील मतभेदांमुळे Virat Kohli ने कर्णधारपद सोडलं? रवी शास्त्रींचे सूचक संकेत

विराट कोहलीसाठी वनडे आणि टी-२० फॉरमॅटमध्ये मोठ्या स्पर्धा जिंकू न शकणे हे एकमेव कारण आहे की, ज्यामुळे विराटला व्हाईट बॉल क्रिकेटमधील कर्णधारपद गमवावं लागलं आहे. कर्णधार म्हणून विराटला 2017 मध्ये पाकिस्तानविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं.

या दोन्ही सामन्यांमध्ये विराटच्या निर्णयांवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, त्यानंतर विराटचा बॅटिंगमधील कामगिरीही त्याच्या लौकिकाला साजेशी होत नव्हती. टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर आता विराटला वनडे संघाच्या कर्णधारपदापासून दूर राहावं लागणार आहे.

    follow whatsapp