लोक काय बोलतात मला फरक पडत नाही; कर्णधार झाल्यानंतर रोहित शर्माने मांडली भूमिका

मुंबई तक

• 02:03 AM • 13 Dec 2021

विराट कोहलीने एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन्ही संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवल्यानं उलट सुलट चर्चा होतं. या सगळ्या चर्चांवर रोहित शर्माने रोखठोक भूमिका मांडली आहे. भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआयला दिलेल्या एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली […]

Mumbaitak
follow google news

विराट कोहलीने एकदिवसीय आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन्ही संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडून रोहित शर्माकडे सोपवल्यानं उलट सुलट चर्चा होतं. या सगळ्या चर्चांवर रोहित शर्माने रोखठोक भूमिका मांडली आहे.

हे वाचलं का?

भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघाचा नवनियुक्त कर्णधार रोहित शर्माने बीसीसीआयला दिलेल्या एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहित शर्माच्या या मुलाखतीची व्हिडीओ ट्विटरवरही शेअर करण्यात आला आहे.

या मुलाखतीत बोलताना रोहितने लोकांकडून मांडण्यात येणाऱ्या मतांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. ‘लोक काह म्हणत आहेत, याचा मला काहीही फरक पडत नाही. संघाचं पूर्ण लक्ष्य उद्देशावर असलं पाहिजे. त्यासाठी खेळांडूमधील संबंध चांगले बनवण्याची गरज आहे’, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

‘तुम्ही जेव्हा भारतासाठी क्रिकेट खेळत असता, त्यावेळी नेहमीच तुमच्यावर दबाव असतो. हा दबाव कायम असतो. लोक तुमच्याबद्दल सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंनी बोलत असतात. एक क्रिकेटपटू म्हणून व्यक्तिगत पातळीवर तुमच्या खेळावर लक्ष्य करणं जास्त महत्त्वाचं असतं. लोक काय म्हणताहेत त्यावर लक्ष्य केंद्रीत करणं गरजेचं नाही. लोक काय बोलत आहेत, यावर तुमचं नियंत्रण नसतं. ही गोष्ट मी यापूर्वी अनेकदा म्हणालो आहे आणि आताही सांगत आहे. हा संदेश संघासाठीही आहे’, असं रोहित शर्मा या मुलाखतीत म्हणाला.

‘संघाने हे समजून घेणं गरजेचं आहे की, जेव्हा आपण महत्त्वाचे सामने खेळतो, तेव्हा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होते. पण आपल्याला हातात ज्या गोष्टी आहेत, त्यावर लक्ष्य केंद्रीत करणं आवश्यक आहे. सामना जिंकणं आणि त्या शैलीत खेळणं, ज्यासाठी तुम्हाला ओळखलं जातं. बाहेर ज्या चर्चा होत आहेत, त्या आपल्या काहीही कामाच्या नाहीत. आपण एक दुसऱ्याविषयी काय विचार करतोय हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याला खेळाडूंमधील संबंध अधिक दृढ करण्याची गरज आहे. याचा फायदा लक्ष्य साध्य करण्यासाठी होऊ शकतो. राहुल द्र्विड यामध्ये आमची मदत करत आहे”, असं रोहित शर्मा म्हणाला.

आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पूर्ण कर्णधार म्हणून भारताचं नेतृत्व करणार आहे. या दौऱ्यापासून रोहित शर्माच्या कर्णधार पदाच्या कारकीर्दीची सुरूवात होणार असून, या दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे.

    follow whatsapp