जोहान्सबर्ग कसोटीच्या पहिल्या दिवसाअखेरीस आफ्रिकेच्या संघाने सामन्यावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पहिल्यांदा बॉलिंग करत असताना भारताला २०२ धावांत गुंडाळल्यानंतर आफ्रिकेने दिवसाअखेरीस १ विकेट गमावत ३५ धावांपर्यंत मजल मारली.
ADVERTISEMENT
डीन एल्गर आणि एडन मार्क्रम जोडीने आफ्रिकेच्या डावाची सावध पद्धतीने सुरुवात करुन दिली. परंतू मोहम्मद शमीच्या टप्पा पडून आत येणाऱ्या बॉलवर मार्क्रम फसला आणि आफ्रिकेला पहिला धक्का बसला. यानंतर केगन पिटरसन आणि कर्णधार डीन एल्गरने संघाचा डाव सावरत पडझड रोखली. दिवसाअखेरीस आफ्रिकेने ३५ धावांपर्यंत मजल मारली.
त्याआधी, कर्णधार लोकेश राहुलचं अर्धशतक, मयांक अग्रवालची आक्रमक सुरुवात, विहारी-पंत आणि आश्विनने मधल्या फळीत दाखवलेला संयम आणि जसप्रीत बुमराहने अखेरच्या क्षणांमध्ये केलेली फटकेबाजी या जोरावर भारताने या सामन्यात २०० धावांचा टप्पा ओलांडला.
भारतीय फलंदाजांनी आजच्या सामन्यात निराशा केली. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या लोकेश राहुलने अर्धशतक झळकावत एकाकी झुंज दिली. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश लावत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं. आफ्रिकेकडून जेन्सनने ४ तर ऑलिव्हर आणि रबाडा यांनी प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या.
SA vs IND : पहिल्याच दिवशी भारताचा डाव आटोपला, आफ्रिकन गोलंदाजांचा भेदक मारा
ADVERTISEMENT