भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये टी-20 (IND vs ENG T20 Series) मालिका खेळत आहेत. भारतीय संघाने इंग्लंडचा पहिल्या दोन सामन्यात दारुण पराभव केला आहे. ज्या मैदानावरती भारतला कसोटी सामना गमवावा लागला होता त्याच एजबॅस्टन येथे, भारतीय संघाने आता टी-20 मालिका आपल्या खिशात टाकली आहे. साउथॅम्प्टनमध्ये पहिला टी-20 सामना 50 धावांनी जिंकल्यानंतर टीम इंडियाने एजबॅस्टन येथे दुसरा T20 सामना 49 धावांनी जिंकला आणि यासह 3 T20 सामन्यांची मालिकाही जिंकली.
ADVERTISEMENT
टीम इंडियाच्या या विजयाने खेळाडूंमधला आत्मविश्वास वाढला आहे. भारतीय संघाच्या कामगिरीवरुन शेजारील पाकिस्तानच्या देखील भूवया उंचावल्या आहेत. कारण भारतीय संघाच्या या कामगिरीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी प्रभावित झाला आहे. त्याने ट्विट करत भारतीय संघाची प्रशंसा केली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतल्यानंतर भारताचा आता व्हाईट वॅश देण्याच्या तयारीत आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने प्रत्येक आघाडीवर लढाई जिंकली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंनी सामन्यादरम्यानचे चढ-उतार अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले आहेत. आणि याचाच परिणाम म्हणून पाकिस्तानात बसलेला शाहिद आफ्रिदीही टीम इंडियाला टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मोठा दावेदार समजत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारताच्या यशाबद्दल शाहिद आफ्रिदी म्हणाला, “टीम इंडियाने अप्रतिम क्रिकेट खेळले आहे. भारतीय संघ मालिका जिंकण्यास पात्र होता, कारण त्यांची गोलंदाजी अप्रतिम आहे. हा संघ ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा मोठा दावेदार आहे”.
इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकून रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली भारताला सलग चौथी टी-20 मालिका जिंकून दिली आहे. त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कपच्या आशाही वाढल्या आहेत. एजबॅस्टन येथे दुसऱ्या टी-20 सामन्यानंतर तो म्हणाला की मी भारतीय संघाच्या ताकदीचे मूल्यांकन करत आहे आणि सध्या त्याचा संघ योग्य दिशेने जात आहे. इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघ प्रत्येक गोष्टीची यशस्वी ठरला आहे, मग ती संघाची फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण असो. टीम इंडियाने तिन्ही विभागात इंग्लंडवर भारी पडला आहे. त्यामुळेच भारताने बलाढ्या इंग्लंडपुढे 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
ADVERTISEMENT