ADVERTISEMENT
टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर विवाहबंधनात अडकणार आहे.
आज (27 फेब्रुवारी) शार्दुल ठाकूर, मिताली पारुळकरसोबत सात फेरे घेणार आहे.
लग्नापूर्वी त्यांच्या संगीत पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये टीम इंडियाचे अनेक क्रिकेटर्स उपस्थित होते.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्नी रितिका सजदेहसह यावेळी उपस्थित होता.
स्टार फलंदाज श्रेयस अय्यरही याठिकाणी दिसला, त्याने शार्दुलसोबत खूप धमाल केली.
देशांतर्गत क्रिकेटचे अनेक स्टार्सनीही यावेळी हजेरी लावली.यामध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही होता.
शार्दुल ठाकूरने त्याच्या या संगीत पार्टीत होणारी पत्नी मितालीसोबत जोरदार डान्स केला.
ADVERTISEMENT