India Tour of South Africa: कोव्हिड-19 चा नवा व्हेरिएंट Omicronचा संसर्ग वाढू लागल्यानंतर आता भारताच्या दक्षिण अफ्रिका दौऱ्याबाबत सस्पेंस निर्माण झाला आहे. क्रिकेट दक्षिण अफ्रिका (CSA) ने संघातील काही सदस्य कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर देशांतर्गत सामन्यांची एक फेरी पुढे ढकलली आहे. अशा परिस्थितीत या महिन्यात होणाऱ्या भारताच्या अफ्रिकन दौऱ्याबाबत चिंता वाढली आहे.
ADVERTISEMENT
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) लवकरच या दौऱ्याबाबत निर्णय घेईल. कारण या मालिकेची सुरुवात ही 17 डिसेंबरपासून होणार आहे. कसोटी मालिकेपासून हा दौरा होणार आहे. त्यामुळे जर भारत-दक्षिण अफ्रिका मालिका झाली तर ती कठोर जैविक दृष्ट्या सुरक्षित (बायो-बबल) वातावरणात होईल.
CSA बोर्डाने एका निवेदनात म्हटले आहे, ‘क्रिकेट दक्षिण अफ्रिका डिव्हिजन 2 CSA चार-दिवसीय होम सीरिजच्या चौथ्या फेरीतील सर्व तीन सामने, जे 2 ते 5 डिसेंबर दरम्यान होणार होते, पुढे ढकलत आहे.’
ही स्पर्धा जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात होत नाही आणि गेल्या काही दिवसात घेण्यात आलेल्या चाचणीत काही जण पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आले आहेत. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.
निवेदनात पुढे असे लिहिले आहे की, ‘क्रीडा क्षेत्रात सहभागी असलेल्या सर्वांचे आरोग्य, सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संस्थेच्या कोव्हिड-19 खबरदारीच्या उपायांची अंमलबजावणी करणे ही CSA ची सर्वोच्च प्राथमिकता आहे.’
बोर्डाने सांगितले की, ‘सीएसए परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि वेळ आल्यावर वर्षातील उर्वरित सामन्यांबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच, या आठवड्याच्या शेवटी होणारे CSA B डिव्हिजन तीन दिवसीय आणि एकदिवसीय सामने देखील 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहेत.’
टीम इंडियाला पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार 8-9 डिसेंबरला दक्षिण अफ्रिकेचा दौरा करायचा आहे. या दौऱ्याची सुरुवात 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे कसोटी सामन्याने होणार आहे.
टीम इंडियाला सुमारे सात आठवड्यांच्या दौऱ्यात तीन कसोटी, तीन एकदिवसीय आणि चार टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. जोहान्सबर्ग, सेंच्युरियन, पार्ल आणि केपटाऊन या चार वेगवेगळ्या शहरांमध्ये हे सामने खेळवले जातील.
Omicron Varient : भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा ठरल्याप्रमाणेच होणार – सौरव गांगुली
मात्र आता द. अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग वाढल्याने टीम इंडिया अफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार की नाही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT